दुसऱ्या माणसासोबत संसार थाटायची घाई! बायकोनं नवऱ्यासह सासुची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे फेकले नदीत

दोन्ही हत्या गुवाहाटीतील चांदमारी आणि नारेंगी भागात दोन वेगवेगळ्या घरात घडल्या. अमरेंद्रची पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य एका व्यक्तीने ही हत्या केली होती.

गुवाहाटी: आसाममध्ये, एका महिलेने तिच्या प्रियकर आणि मित्रासह मिळुन  पती आणि सासूची हत्या केली, (Woman kills husband & mother-in-law) त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले, पॉलिथिनमध्ये पॅक केले, मेघालयात नेले आणि  फेकले. अमरेंद्र डे आणि शंकरी डे अशी पती आणि सासुचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे ही हत्या गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करण्यात आली आहे. त्याचं  गूढं उकलण्यात आता पोलिसांना यश आलंय. या घटनेनं पुन्हा एकदा दिल्लीतील श्रद्ध वालकर हत्याकांडची आठवण करुन दिली आहे.

पोलिसांना मिळालेल्या मृतदेहाच्या तुकड्यांनी उघडलं रहस्य

 गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दिगंत बराह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “सात महिन्यांपूर्वी ही हत्या करण्यात आली होती. आम्ही तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. पोलिस उपायुक्त (मध्य) दिगंत कुमार चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पत्नीने सप्टेंबरमध्ये पती आणि सासू यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान रविवारी मेघालयातून महिलेच्या सासू-सासर्‍यांच्या शरीराचे काही भाग मिळण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. 

चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मृतक अमरेंद्रच्या चुलत भावाने आणखी एक बेपत्ता तक्रार दाखल केली, ज्यामुळे पत्नीवर संशय निर्माण झाला.” दोन्ही गुन्ह्यांची नूनमती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही हत्या गुवाहाटीतील चांदमारी आणि नारेंगी भागात दोन वेगवेगळ्या घरात घडल्या. अमरेंद्रची पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य एका व्यक्तीने ही हत्या केली होती. तो तिचा बालपणीचा मित्र असल्याचा संशय आहे. चौधरी म्हणाले, “हत्येनंतर त्यांनी मृतदेहांचे छोटे तुकडे केले, ते पिशव्यांमध्ये भरले आणि मेघालयला नेले. तेथे त्यांनी ते तुकडे टेकड्यांवर फेकून दिले.” पोलिस उपायुक्त म्हणाले, “आम्ही मृतदेह शोधून काढले आणि काल मेघालयातून काही भाग सापडले. दोन्ही मृतांच्या मृतदेहाचे सर्व अवयव शोधण्यासाठी आमचे ऑपरेशन सुरू आहे.