
आरोपींनी तिच्या मित्राला धमकावले आणि तिला कारमध्ये ओढले. त्यानंतर आरोपींनी शहरातील विविध ठिकाणी कार नेली आणि रात्रभर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
बंगळुरू मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपल्या मित्रासोबत पार्कमध्ये बसलेल्या तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये ओढून तिच्यावर सामूहिक बलात्कार (Banglore Gangrap News) करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही घटना २५ मार्च रोजी रात्री उशिरा घडली. या घटनेमुळे बंगळुरुतील मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी तिच्या पुरुष मित्रासोबत नॅशनल गेम्स व्हिलेज पार्कमध्ये बसली होती. यावेळी आरोपींनी तिच्या मित्राला धमकावले आणि तिला कारमध्ये ओढले. त्यानंतर आरोपींनी शहरातील विविध ठिकाणी कार नेली आणि रात्रभर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी नंतर तिला 26 मार्चच्या पहाटे तिच्या राहत्या घराजवळ सोडले. पहाटे 4 वाजता घरी पोहोचल्यानंतर पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर पोलिसात तक्रार दाखल केली.