पनवेल स्थानकाजवळ आढळलेल्या महिला मृतदेहाचा उलगडा; सुपारी देऊन हत्या

गुरुवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी नेहमीप्रमाणे पनवेल स्थानकात उतरल्या. त्यानंतर त्या ५ मिनिटांनी स्थानकाबाहेर (नवीन पनवेल) रिक्षा थांब्याशेजारी पायी चालत असताना दबा धरुन बसलेल्या मारेक-यांनी त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

    पनवेल : पनवेल रेल्वेस्थानकातील (Panvel Railway Station) पूर्वबाजूस नवीन पनवेल वसाहतीमध्ये चार दिवसांपूर्वी आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचा (Death Body) उलगडा करण्यात यश आले आहे. प्रियंका रावत (३९) या प्रवासी महिलेची अनोळखी मारेक-यांनी हत्या (Murder) केल्याने खळबळ माजली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) दलाने वेगवेगळी शोधपथक स्थापन करुन मारेक-यांचा तपास सुरु केला होता. पोलिसांच्या अधिक तपासात प्रियंका यांच्या पतीसह (Husband) त्याच्या प्रियसीने हा कट रचून सुपारी दिल्याचे उघड झाले आहे.

    पती देखतसिंग याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती प्रियंका यांना नुकतीच कळाली होती. प्रियंका आणि देखतसिंग हे परिवारासह विहीघर गावातील महालक्ष्मी सोसायटीत राहत होते. प्रियंका या ठाणे येथील डिजिटल मार्केटींग कंपनीमध्ये काम करुन संसाराला मदत करत होत्या.

    गुरुवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी नेहमीप्रमाणे पनवेल स्थानकात उतरल्या. त्यानंतर त्या ५ मिनिटांनी स्थानकाबाहेर (नवीन पनवेल) रिक्षा थांब्याशेजारी पायी चालत असताना दबा धरुन बसलेल्या मारेक-यांनी त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रात्रीच्यावेळेच एकाकी प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला होता.