मुुंबईत लालबागमध्ये फ्लॅाटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, प्लॅस्टिकमध्ये गुंडाळुन फेकण्याचा होता प्लॅन? मुलीवर संशय

मायानगरी मुंबई आणि आयटी हब बेंगळुरूमध्ये अशाच दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत, ज्यांच्या बातमीने लोकांना धक्का बसला आहे. हत्येनंतर दोन्ही ठिकाणी मृतदेह लपविण्याचा धक्कादायक प्रयत्न करण्यात आला. मृतदेह मुंबईत बॅगेत, तर बेंगळुरूमध्ये ड्रममध्ये सापडला.

मुंबई : मुंबईतुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवसाला पावणाऱ्या गणपतीची  स्थापना होत असलेल्या प्रसिद्ध लालबाग (Lalbag) परिसरात एका फ्लॅटमधे प्लास्टिकच्या पिशवीत एका महिलेचा मृतदेह (Women Dead body Found In Flat) सापडला आहे. बीना जैन (वय ५३) असं या मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी तिच्या मुलीवर हत्येचा संशय व्यक्त केला असुन तिची सतत चौकशी करण्यात येत आहे.

कुठे घडली घटना?

मुंबईतील लालबाग परिसरातील पेरू कंपाऊंडमध्ये ही घटना घडली असुन येथील एका इब्राहिम कासम नावाच्या इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह हाती लागला असून सगळ्यात भयंकर म्हणजे महिलेचे शव प्लॅस्टिक बॅगेत बांधून ते एका कपाटात बंद करून ठेवले होते. मृत महिलेचे वय ५० ते ५५ वर्ष असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

बंगळुरूतही  रेल्वे स्टेशनवर आढळला मृतदेह

मायानगरी मुंबईप्रमाणे आयटी हब बेंगळुरूमध्ये अशीच खुनाची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एसएमव्हीटी बंगळुरूत एका अज्ञात महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये पडलेला आढळून आला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असुन ड्रम घेऊन ते रेल्वे स्टेशनवर टाकणाऱ्या तिघांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत.

सोमवारी सकाळी रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) जवानांना दुर्गंधी आल्याने हा गुन्हा उघडकीस आला. संध्याकाळी अधिकाऱ्यांना एक ड्रम सापडला. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरून कुजलेला मृतदेह बाहेर काढला आहे. यापूर्वी 4 जानेवारी रोजी यशवंतपूर रेल्वे स्थानकावर आणि 6 डिसेंबर 2022 रोजी बैयप्पनहल्ली रेल्वे स्थानकावर दोन मृतदेह सापडले होते. एसपी रेल्वे डॉ. सौम्यलता एसके म्हणाले की, ते हत्येतील साम्य तपासणार आहेत. पोलिसांनी या दाव्याला प्रतिसाद दिला नसला तरी या हत्येत सीरियल किलरचा सहभाग असावा, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.