विदर्भात 100% तर मराठवाड्यात 98% पावसाचा अंदाज

यंदा दक्षिण पश्चिम मान्सून उत्तर आणि दक्षिण भारतात सामान्य, मध्य भारतात सामान्यपेक्षा अधिक तर ईशान्येत सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दक्षिम पश्चिम मान्सून 2021 साठी पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त करताना आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी देशात यंदा मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा जून-सप्टेंबर या काला‌धीत 96 ते 104 टक्के पर्जन्यमानाची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

  दिल्ली : यंदा दक्षिण पश्चिम मान्सून उत्तर आणि दक्षिण भारतात सामान्य, मध्य भारतात सामान्यपेक्षा अधिक तर ईशान्येत सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दक्षिम पश्चिम मान्सून 2021 साठी पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त करताना आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी देशात यंदा मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा जून-सप्टेंबर या काला‌धीत 96 ते 104 टक्के पर्जन्यमानाची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

  राज्यात 99% पावसाचा अंदाज

  महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड पडेल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. विदर्भातील विविध भागात म्हणजे पश्चिम विदर्भात 98%, मध्य विदर्भात 102%, पूर्व विदर्भात 100%, मराठवाडा 98%, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात 98%, पश्चिम महाराष्ट्रात 99% मान्सून बरसेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

  हवामान खात्याचा अंदाज

  • भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याची शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के, उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
  • भारतीय हवामान विभागाने जून महिन्यात देशभरातील विविध भागांचा सर्वसाधारण अंदाज वर्तवला आहे. पूर्व भारत, मध्य भारत, हिमालय आणि मध्य भारताचा पूर्वेकडील भागामध्ये मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहील.
  • उत्तर पूर्व भागात, दक्षिण भारतातील दख्खनचे पठार, उत्तर पूर्वेकडील काही भागात सरासरीच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस पडेल.

  केरळात विलंब

  केरळात मान्सूनच्या आगमनास विलंब होण्याची यंदा शक्यता आहे. 3 जून रोजी तो राज्यात पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कर्नाटकातील किनारपट्टी भागात चक्रीवादळ आल्यामुळे मान्सूनला विलंब झाला असल्याची माहिती महापात्रा यांनी दिली. यापूर्वी केरळात 31 मे रोजी मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज होता.