१०५ वर्षीय आजींबाईंनी केली कोरोनावर मात

  • दिल्ली - कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच कोणाकोणाला कोरोना झालेला अस समजल्यास ते हातपाय गाळून बसतात. तर काही रुग्ण आत्महत्या करत आहेत. परंतु नोएडामध्ये १०५ वर्षीय अफगानी आजींनी कोरोनावर मात केली आहे. नोएडामधील शारदा रुग्णालयात या आजींवर उपचार सुरु होते. त्या मृत्यूशी झगडत होत्या परंतु डॉक्टरने ७ दिवसांच्या उपचारावर त्यांना ठणठणीत केले आहे. या आजीबाईं सलग ७ दिवस व्हेंटिलेटरवर होत्या अनेक आजारांसोबतच त्या कोरोनाशी झुंज देत होत्या. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी घेतलेल्या काळजीमुळे १०५ वर्षाीय आजीबाईने कोरोनावर मात दिली आहे. शारदा रुग्णालयातील सुपरिटेंडेंट डॉक्टर आशुतोष निरंजन यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयातील तपासणीनंतर कोरोनाबाधित असलेल्या रुबिया यांना शारदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांना ताप श्वास घेण्यास त्रास आणि न्युमोनियाची लक्षण होती. तसेच त्यांना अलजाइमर असल्यामुळे त्या नातेवाईकांना ओळखत नव्हत्या. रुबिया यांच्यावर आयसीएमआर आणि शारदा रुग्णालयातील नियमानुसार उपचार सुरु होते. त्या एक्युट रिसपाइरेटरी ड्रिसट्रेस सिंड्रोम या स्टेजवर येईपर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांन सलग ७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे दिसले. तसेच रुग्णालयातील स्टाफ आणि डॉक्टरांनी केलेल्या सेवेमुळे त्यांनी १५ दिवसांत कोरोनावर मात केली आहे. या आजीबाईंचा जगण्याच्या जिद्द आणि हिंतीमुळे त्यांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोना बाधितांसमोर त्यांनी स्वतःचे एक उदाहरण निर्माण केले आहे.

दिल्ली – कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच कोणाकोणाला कोरोना झालेला अस समजल्यास ते हातपाय गाळून बसतात. तर काही रुग्ण आत्महत्या करत आहेत. परंतु नोएडामध्ये १०५ वर्षीय अफगानी आजींनी कोरोनावर मात केली आहे. नोएडामधील शारदा रुग्णालयात या आजींवर उपचार सुरु होते. त्या मृत्यूशी झगडत होत्या परंतु डॉक्टरने ७ दिवसांच्या उपचारावर त्यांना ठणठणीत केले आहे. या आजीबाईं सलग ७ दिवस व्हेंटिलेटरवर होत्या अनेक आजारांसोबतच त्या कोरोनाशी झुंज देत होत्या. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी घेतलेल्या काळजीमुळे १०५ वर्षाीय आजीबाईने कोरोनावर मात दिली आहे. 

शारदा रुग्णालयातील सुपरिटेंडेंट डॉक्टर आशुतोष निरंजन यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयातील तपासणीनंतर कोरोनाबाधित असलेल्या रुबिया यांना शारदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांना ताप श्वास घेण्यास त्रास आणि न्युमोनियाची लक्षण होती. तसेच त्यांना अलजाइमर असल्यामुळे त्या नातेवाईकांना ओळखत नव्हत्या. 

रुबिया यांच्यावर आयसीएमआर आणि शारदा रुग्णालयातील नियमानुसार उपचार सुरु होते. त्या एक्युट रिसपाइरेटरी ड्रिसट्रेस सिंड्रोम  या स्टेजवर येईपर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांन सलग ७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे दिसले. तसेच रुग्णालयातील स्टाफ आणि डॉक्टरांनी केलेल्या सेवेमुळे त्यांनी १५ दिवसांत कोरोनावर मात केली आहे. या आजीबाईंचा जगण्याच्या जिद्द आणि हिंतीमुळे त्यांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोना बाधितांसमोर त्यांनी स्वतःचे एक उदाहरण निर्माण केले आहे.