आंदोलनातील ११ शेतकऱ्यांचे उपोषण सुरू ; कायदे रद्द होत नाही तोपर्यंत माघार नाही शेतकरी भूमिकेवर ठाम

आजपासून दररोज ११ शेतकरी उपोषण करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन सेक्रटरी बलवंत सिंग यांनी दिली आहे. जोंपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती किसान संयुक्त मोर्चाचे रामपाल सिंह यांनी दिली आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात तब्बल २६ दिवसानंतरही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. हरियाणा-पंजाबच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनातील ११ शेतकरी २४ तासांसाठी उपोषणाला बसले आहेत.  केंद्र सरकारच्या विरोधात हे उपोषण असून आजपासून दररोज ११ शेतकरी उपोषण करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन सेक्रटरी बलवंत सिंग यांनी दिली आहे.
याशिवाय ५ ते २७ डिसेंबरदरम्यान हरयाणातील महामार्गांवरील टोलवसुली करू देणार नाही. तसंच २३ डिसेंबरला म्हणजे येत्या बुधवारी शेतकरी दिवस आहे. या दिवशी देशातील जनतेने एक दिवसाचं उपोषण करावं, असं आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी केलं आहे. दिल्लीतील बुराडी येथेही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या संघर्षाला ३ ते ४ महिने झाले आहेत. जोंपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती किसान संयुक्त मोर्चाचे रामपाल सिंह यांनी दिली आहे.

एकीकडे ऐन थंडीत शेतकऱ्यांचे नवीन कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. तर, दुसरीकडे काही शेतकरी या कायद्यांना पाठिंबा देत आहेत. रविवार पश्चिम यूपीतील शेतकऱ्यांनी कृषी भवन येथे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. आणि नवीन कायद्यांना समर्थन देणारे निवेदन सादर केले.