11 days and 1000 km cycle journey; Unique support for 60 year old Manjhi

दिल्ली : दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बिहारच्या ‘मांझी’ने तब्बल १००० किमीचा प्रवास केला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी तब्बल ११ दिवस सायकल चालवली.

सत्यदेव मांझी असे या व्यक्तीचे नाव असून ते शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली-हरयाणाच्या टिकरी सीमेवर पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय सत्यदेव हे बिहारच्या सीवान जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

दिल्ली-हरयाणाच्या टिकरी सीमेवर शेतकऱ्यांना आपले समर्थन देण्यासाठी पोहोचले आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी सलग ११ दिवस सायकल चालवत १००० किलोमीटरचे अंतर पार करत प्रवास केला.

शेतकऱ्यांचे हीत पाहता सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत अशी विनंती सत्यदेव मांझी यांनी केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन संपेपर्यंत मी आता येथेच राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.