30 दिवसांच्या आत  नुकसान भरपाई दिली नाही तर द्यावे लागेल 12 टक्के व्याज; कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा नवा कायदा

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून लवकरच कामगारांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहे. कामगार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2020 चा मसुदा जाहीर केला आहे. एखाद्या कर्मचारी कर्तव्यावर कार्यरत असताना जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, त्याला कंपनीने एक महिना म्हणजेच 30 दिवसांच्या आत कंपन्सेशन अर्थात नुकसान भरपाई देणे बंधनकारक असेल.

    दिल्ली : केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून लवकरच कामगारांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहे. कामगार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2020 चा मसुदा जाहीर केला आहे. एखाद्या कर्मचारी कर्तव्यावर कार्यरत असताना जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, त्याला कंपनीने एक महिना म्हणजेच 30 दिवसांच्या आत कंपन्सेशन अर्थात नुकसान भरपाई देणे बंधनकारक असेल.

    कामगार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2020 अंतर्गत कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईशी संबंधित मसुद्यातील नियम संबंधितांकडून सूचना आणि आक्षेप मागविण्यासाठी जाहीर केले आहे. कर्तव्यावरील कामगार जखमी झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, त्याला 30 दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावी लागेल.

    यात एक दिवसही उशीर झाल्यास कर्मचाऱ्याला 12 टक्के व्याजासह नुकसान भरपाईची रक्कम देणे कंपनीला बंधनकारक असेल. या नियमांवर सूचना किंवा कोणाला आक्षेप असल्यास अधिसूचनेच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत त्या कळविण्याचे आवाहन कामगार मंत्रालयाने केले आहे.

    हे सुद्धा वाचा