दिल्ली हादरली – घरमालकाच्या नातेवाईकाने केला घृणास्पद प्रकार,१३ वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या

दिल्लीत(Delhi) एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर घरमालकाच्या नातेवाईकाने बलात्कार(13 Year Old Girl Raped And Killed) करून हत्या केल्याचे समोर आले आहे.

  दिल्लीत(Delhi) एक भयानक घटना घडली आहे. दिल्लीत एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर घरमालकाच्या नातेवाईकाने बलात्कार(13 Year Old Girl Raped And Killed) करून हत्या केल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या पालकांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे.आरोपी घरमालकाच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणात घरमालक आणि त्याच्या पत्नीच्या कथित सहभागाची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

  पीडित मुलीच्या वडिल म्हणाले की, आरोपीने पहिल्यांदा आपल्या मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला आणि मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव आणला. मात्र, मुलीच्या चेहऱ्यावर आणि खाजगी भागावर गंभीर जखमा होत्या. शवविच्छेदन अहवालात मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं.

  कुटुंबातीलच एक व्यक्ती असल्याप्रमाणे जवळच्या असलेल्या जमीनमालकाच्या शिफारशीनुसार गेल्या महिन्यात पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीला आरोपी प्रवीणसोबत गुडगाव येथील त्याच्या घरी काम करण्यास पाठवले होते.

  पीडितेच्या वडिलांनी म्हटलं कू, “घरमालकाच्या पत्नीने मला सांगितलं की तिच्या भावाला एक लहान मुलगी आहे आणि माझी मुलगी तिच्याबरोबर खेळू शकते. उरलेला वेळ कुटुंबासोबत राहू शकते. तिने १७ जुलै रोजी माझ्या मुलीला नेलं. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारास मला घरमालकाचा फोन आला. ते म्हणाले माझी मुलगी विषबाधेमुळे मरण पावली आहे. चार तासांनंतर घरमालकाची पत्नी, प्रवीण आणि इतर दोघांनी माझ्या मुलीचा मृतदेह एका खासगी रुग्णवाहिकेतून दिल्लीला आणला. मुलीच्या वडिलांवर यावेळी अंत्यसंस्कारासाठी दबाव आणला गेला.”

  पीडित मुलीचे वडील पुढे म्हणाले की, “त्यांच्याकडे लाकूड आणि पूजेच्या वस्तू होत्या. ते माझ्या मुलीचे अंत्यसंस्कार करण्यास तयार होते. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आमच्या शेजाऱ्यांनी हे अंत्यसंस्कार थांबवले. त्यांनी आम्हाला माझ्या मुलीच्या शरीराची तपासणी करण्यास सांगितलं. जेव्हा आम्ही मृतदेह पाहिला तेव्हा आम्हाला धक्काच बसला. तिच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर जखमा होत्या. आम्ही कल्पनाही केली नव्हती की ते माझ्या मुलीचा जीव घेतील. आम्ही घाबरलो आणि पोलिसांना बोलवलं.”

  पुढे बाबू जगजीवन राम रुग्णालयात करण्यात आलेल्या पीडित मुलीच्या पोस्टमार्टमच्या अहवालात असं म्हटलं आहे की, “योनी आणि गुदद्वारासंबंधी लैंगिक अत्याचाराचे पुरावे आहेत आणि सर्व जखमा मृत्यू पूर्वीच्या अगदी जवळच्या कालावधीतील आहेत.”