15 to 20 terrorists mokat! On Mumbai radar, search for terrorist network begins

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांनी देशात घातपाताचा कट रचला होता, असे स्पष्ट झाले आहे. देशात अद्यापही 15-20 दहशतवादी मोकाट फिरत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या दहशतवाद्यांकडून दोन किलो आरडीएक्स, दोन हातगोळे, दोन इटालियन पिस्तूल व मोठ्या प्रमाणात काडतुसेही जप्त करण्यात आली आहे.

  दिल्ली : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांनी देशात घातपाताचा कट रचला होता, असे स्पष्ट झाले आहे. देशात अद्यापही 15-20 दहशतवादी मोकाट फिरत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या दहशतवाद्यांकडून दोन किलो आरडीएक्स, दोन हातगोळे, दोन इटालियन पिस्तूल व मोठ्या प्रमाणात काडतुसेही जप्त करण्यात आली आहे.

  घातपाताच्या या सर्व वस्तू प्रयागराज येथून जप्त करण्यात आल्या आहेत. येथे ताब्यात घेण्यात आलेला दहशतवादी जिशान व स्फोटके दिल्लीला आणली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व स्फोटकांचा साठा जप्त करण्यता आल्यामुळे चिंताही व्यक्त केली जात आहे. आता सरकार दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा शोध घेत आहे.

  पाकिस्तानातून आली शस्त्रास्त्रे व स्फोटके

  आरडीएक्स व हातगोळे पाकिस्तानातून भारतात आले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही सर्व सामग्री एकत्रित केली जात होती असे सांगून पाकिस्तानातून पुन्हा एक खेप येणार होती. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचे कारस्थान रचण्यात आले होते त्या भागाची रेकीही केली जाणार होती. प्रारंभिक तपासात यात अन्य दहशतवादीही सहभागी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

  साखळी बॉम्बस्फोट करण्याचे षडयंत्र

  दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी देशभरात छापेमारी सुरू करण्यात आली असून अटक केलेल्या दहशतवाद्यांनी देशातील दिल्लीसह मेट्रो शहरांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचला होता असे समोर आले आहे. ओसामा व जिशान बॉम्ब तयार करण्याची तयारीही करीत होते. त्यांनी दोन आयईईडीही तयार केले होते असे चौकशीत समोर आले आहे. एवढेच नव्हे तर अनेक राजकारणी नेत्यांसह धार्मिक नेतेही त्यांचे टार्गेट होते. यासोबतच दिल्लीपाठोपाठ अयोध्यासह संपूर्ण उत्तर प्रदेशही त्यांचे लक्ष्य होते असेही समोर आले आहे.