election commission

निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्यास दोन वर्षांच्या शिक्षेच्या तरतुदीसह सुधारणांसंबंधातील प्रस्तावावर वेगाने पावले उचलावीत याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहिले आहे.

    दिल्ली : निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्यास दोन वर्षांच्या शिक्षेच्या तरतुदीसह सुधारणांसंबंधातील प्रस्तावावर वेगाने पावले उचलावीत याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहिले आहे.

    आयोगाने निवडणूक प्रक्रियेत ज्या सुधारणांचा प्रस्ताव दिला आहे त्यात एक प्रस्ताव निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्यास सहा महिन्यांच्या तुरुंगवासाचीही तरतूद असून ती वाढवून दोन वर्षे करण्यासंदर्भातील प्रस्ताव आहे.

    शिक्षा झाल्यास संबंधित उमेदवाराच्या निवडणूक लढविण्यावर सहा वर्षांचीही बंदी असेल. सद्यस्थितीत सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद असल्यानेच निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाऊ शकत नाही, असेही चंद्रा यांनी पत्रात नमूद केले आहे.

    हे सुद्धा वाचा