जेलमध्ये बसुन केली तब्बल 200 कोटींची वसुली! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी ईडीची धाड

200 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणात ईडीने चेन्नईत छापेमारी करून कोट्यवधींचा बंगला आणि 16 महागड्या कार जप्त केल्या आहेत. ही सर्व मालमत्ता सुकेश चंद्रशेखरने तिहार कारागृहात राहून 200 कोटींच्या खंडणीतून उभारली होती. या प्रकरणी ईडीने सुकेश चंद्रशेखरची पत्नी लीना मारिया पॉलचीही चौकशी केली. लीना मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री असून हिंदी चित्रपट ‘मद्रास कॅफे’तही तिने अभिनय केला होता.

    दिल्ली : 200 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणात ईडीने चेन्नईत छापेमारी करून कोट्यवधींचा बंगला आणि 16 महागड्या कार जप्त केल्या आहेत. ही सर्व मालमत्ता सुकेश चंद्रशेखरने तिहार कारागृहात राहून 200 कोटींच्या खंडणीतून उभारली होती. या प्रकरणी ईडीने सुकेश चंद्रशेखरची पत्नी लीना मारिया पॉलचीही चौकशी केली. लीना मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री असून हिंदी चित्रपट ‘मद्रास कॅफे’तही तिने अभिनय केला होता.

    मनी लाँड्रिंग प्रकरणात एका आरोपीची ईडी चौकशी करीत होती. त्यावेली काही फोन कॉल्स ईडीच्या हाती लागले. एका कॉलवर एक व्यक्ती स्वत: सरकारी अधिकारी असल्याचे सांगून तपास संपविण्याबाबत सांगत होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तथापि चौकशीत जो फोन कॉल सरकारी अधिकाऱ्याच्या नावे येत होता तो क्रमांक कोणाचा होता हे मात्र माहित नव्हते.

    सखोल तपास केला असता हा कॉल तिहारमधील एका गुन्हेगार करीत असल्याची माहिती अखेर ईडीला मिळाली. सुकेश चंद्रशेखर जयललितांच्या मृत्यूनंतर शशिकला यांना अद्रमुकचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]