2024 Target, Opponent Efficient! 19 parties' strong plan against BJP; Chief Minister Uddhav Thackeray also participated

भाजपाच्या नेतृत्वातील केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात 2024 मध्ये मजबूत पर्याय देण्याचे लक्ष्य विरोधकांनी या बैठकीत निर्धारित केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, सीपीआय, सीपीएम, राजद आणि झामुमोसह 19 विरोधी पक्षांनी 2024 च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस हेरगिरी, कृषी कायदे, महागाईच्या मुद्यावरून 15 विरोधी पक्षांनी मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली होती.

  दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेससह विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष अधिक आक्रमक झाल्याचs पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 19 पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत 2024 मध्ये भाजपा सरकारविरोधात सक्षम पर्याय देण्यावर विरोधकांचे एकमत झाले.

  संसदेतील एकजुटीचे कौतुक

  भाजपाच्या नेतृत्वातील केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात 2024 मध्ये मजबूत पर्याय देण्याचे लक्ष्य विरोधकांनी या बैठकीत निर्धारित केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, सीपीआय, सीपीएम, राजद आणि झामुमोसह 19 विरोधी पक्षांनी 2024 च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस हेरगिरी, कृषी कायदे, महागाईच्या मुद्यावरून 15 विरोधी पक्षांनी मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली होती.

  यामुळे नियोजित कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीच लोकसभेचे कामकाज गुंडाळण्यात आले. संसद अधिवेशनातील विरोधकांच्या एकजुटीचे सोनिया यांनी या बैठकीत कौतुक केले. याचबरोबर, राष्ट्रहितासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन सोनिया यांनी यावेळी केले. बैठकीत केंद्र सरकारविरोधात राष्ट्रीय आंदोलन उभारण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सहभागी

  या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. तसेच, राहुल गांधी, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हेदेखील आभासी पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते. बिगरभाजपा मुख्यमंत्र्यांनी विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर भेदभाव करीत असल्याचा आरोप केला.

  लोकसभा निवडणुका अंतिम ध्येय

  2024 च्या लोकसभा निवडणुका आपले अंतिम ध्येय आहे. संसदेत विरोधकांनी दाखविलेली एकजूट अशीच कायम ठेवावी आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी सरकारला सक्षम पर्याय देण्यासाठी आणि राष्ट्रहितार्थ विरोधकांनी एकत्र यावे. रालोआविरोधात एकजुट होऊन लढण्याशिवाय आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या.

  नियोजन करणे गरजेचे विरोधकांची ही बैठक सकारात्मक झाली. या बैठकीमध्ये मी माझे मुद्दे उपस्थितीत केले. मोदी सरकार अनेक मुद्यांवर तोडगा काढण्यास अपयशी ठरले आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर ज्यांचा विश्वास आहे, जे लोकशाहीचे सिद्धांत वाचवण्यासाठी लढा देत आहे, त्यांनी एकत्र यावे. विरोधकांनी एक कालबद्ध कार्यक्रम आखावा. सर्वच मुद्यांवर लढण्यापेक्षा प्राथमिकता ठरवून नियोजन करणे गरजेचे आहे.

  - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस