पुढील दोन दिवसात रेल्वेच्या २१ गाड्या रद्द; जाणून घ्या रद्द झालेल्या गाड्या

भारतीय रेल्वेने (Indian Railways) २१ गाड्या रद्द केल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत या गाड्या २५ मेपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे . पूर्व मध्य रेल्वेच्यावतीने (East Central Railway) ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

  नवी दिल्ली: येत्या एक-दोन दिवसांत रेल्वेने प्रवास करण्याची योजना आखत असाल तर तुम्ही ही महत्वाची बातमी नक्की वाचा भारतीय रेल्वेने (Indian Railways) २१ गाड्या रद्द केल्या आहेत. ही रेल्वे बिहार मार्गावर धावत होती. दरम्यान, पुढील आदेशापर्यंत या गाड्या २५ मेपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज प्रवास करण्यापूर्वी तुमच्या ट्रेनचे स्टेटस काळजीपूर्वक तपासा, जेणेकरून स्टेशनवर पोहोचल्यानंतर आपल्याला त्रास होणार नाही. पूर्व मध्य रेल्वेच्यावतीने (East Central Railway) ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या गाड्या पाटणा, भभुआ, राजेंद्र नगर टर्मिनल, सीलदार, दानापूर, सिकंदराबाद, सहरसा अशा अनेक मार्गांवर चालवल्या जात आहेत.

  रेल्वेकडून ट्विट…
  पूर्व मध्य रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, प्रवाशांच्या संख्येत सतत होणारी घट आणि कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने काही विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवास करण्यापूर्वी एकदा या गाड्यांची यादी तपासण्यात यावी.
  २५ मेपासून रद्द करण्यात आलेल्या गाड्या…(Train cancel list from 25 may)

  ०३२४९ पाटणा-भभुआ रोड इंटरसिटी स्पेशल ट्रेन २५ मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द
  ०३२५० भभुआ रोड-पाटणा इंटरसिटी स्पेशल ट्रेन २५ मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द
  ०३२५० पाटणा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन २६ मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द
  ०३२६० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पाटणा विशेष ट्रेन २८ मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द
  ०३२५३ पाटणा-बनसवाडी विशेष ट्रेन २७ मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
  ०३२५४ बनासवाडी ते पाटणा विशेष ट्रेन ३०मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
  ०३२४२ राजेंद्रनगर टर्मिनल-बांका विशेष रेल्वेगाडी २५ मेपासून पुढील आदेशपर्यंत रद्द.

  (Corona Vaccination : सरकारचा मोठा निर्णय, आता १८-४४वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार)

  ०३२४१ बांका-राजेंद्रनगर टर्मिनल विशेष ट्रेन २६ मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द
  ०३६४२ पंडित दीन दयाल उपाध्याय जम्मू-दिलदारनगर पॅसेंजर स्पेशल ट्रेन २५ मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
  ०३६४१ दिलदारनगर- पंडित दीन दयाल उपाध्याय जं. पॅसेंजर २५ मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
  ०३६४३ दिलदारनगर-तारीघाट पॅसेंजर विशेष ट्रेन २५ मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
  ०३६४४ तारीघाट- दिलदारनगर पॅसेंजर स्पेशल ट्रेन २५ मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द
  ०३६४७ दिलदारनगर- तारिघाट पॅसेंजर स्पेशल ट्रेन २५ मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

  या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

  ०३१६९ सियालदह – सहरसा विशेष ट्रेन२५ मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
  ०३१७० सहरसा – सियालदह विशेष ट्रेन २६ मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
  ०३१६३ सियालदह -सहरसा विशेष रेल्वेगाडी २३ मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
  ०३१६४ सहरसा – सियालदह विशेष गाडी २४ मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
  ०३१६० सहरसा-सियालदह विशेष ट्रेन (भाया पूर्णिया) २६ मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द
  ०७०५२ दानापुर सिकंदराबाद २५ मे रोजी रद्द