
भाजपाची सत्ता असलेल्या दिल्ली महानगरपालिकेतील 2,500 कोटी रुपयांचा घोटाळा राष्ट्रकुल खेळांमध्ये झालेल्या घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला. दिल्लीतील महानगरपालिका घोटाळे आणि भ्रष्टाचाराची केंद्रे बनली आहेत. हा 2500 कोटी रुपयांचा घोटाळा तर फक्त एका महापालिकेतील आहे, उर्वरित महानगरपालिकांचीही अशीच परिस्थिती आहे, असे केजरीवाल म्हणाले. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या सत्राला केजरीवाल यांनी संबोधित केले.
दिल्ली (Delhi). भाजपाची सत्ता असलेल्या दिल्ली महानगरपालिकेतील 2,500 कोटी रुपयांचा घोटाळा राष्ट्रकुल खेळांमध्ये झालेल्या घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला. दिल्लीतील महानगरपालिका घोटाळे आणि भ्रष्टाचाराची केंद्रे बनली आहेत. हा 2500 कोटी रुपयांचा घोटाळा तर फक्त एका महापालिकेतील आहे, उर्वरित महानगरपालिकांचीही अशीच परिस्थिती आहे, असे केजरीवाल म्हणाले. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या सत्राला केजरीवाल यांनी संबोधित केले.
आमच्यावर दोनवेळा सीबीआयच्या धाडी टाकण्यात आल्या आम्ही तोंडातून एक शब्दही काढला नाही. कारण आम्ही काहीही लपवून ठेवले नव्हते. पण आम्ही जेव्हा 2500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली, तेव्हा यांनी चोरी करण्याऐवजी चौकशीची मागणी करणाऱ्यांनाच पकडले, त्यामुळे पुर्ण डाळच काळी आहे, असा टोमणाही त्यांनी भाजपाला मारला. तसेच, या प्रकरणाती सत्य बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा सीबीआय चौकशीची मागणी करताना जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, असेही केजरीवाल म्हणाले.
विधानसभेत गदारोळ
दरम्यान, महानगरपालिकेतील घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत फलक फडकावून मोठा गदारोळ केला. त्यांनी अध्यक्षांच्या आसनापुढे जमून भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आपच्या आमदारांनी केलेल्या या गदारोळामुळे विधानसभाध्यक्ष रामनिवास गोयल यांनी 15 मिनीटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकुब केले. त्यानंतरही हा गोंधळ सुरूच राहिला. महापालिका घोटाळ्यावरून गेले काही दिवस भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात वादंग सुरू आहे.