भाजपाला अज्ञात स्रोतांकडून २६४२ कोटींची आर्थिक मदत; ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस’च्या (एडीआर) अहवालातून खुलासा

चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांना (the national parties) अज्ञात स्रोतांकडून (unknown sources) मिळालेले एकूण उत्पन्न 3377.41 कोटींच्या घरात आहे. या कमाईत भाजपने (BJP) बाजी मारली आहे.

    दिल्ली (New Delhi) : आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये (In the financial year 2019-20) भाजपला (the BJP) अज्ञातांकडून तब्बल 2642.63 कोटी रुपये मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांना (the national parties) अज्ञात स्रोतांकडून (unknown sources) मिळालेले एकूण उत्पन्न 3377.41 कोटींच्या घरात आहे. या कमाईत भाजपने (BJP) बाजी मारली आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस’ (एडीआर)च्या (the Association for Democratic Reforms) (ADR) नव्या अहवालातून ही आकडेवारी उघडकीस आली आहे.

    ‘एडीआर’च्या अहवालानुसार, 2019-20च्या आर्थिक वर्षात भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, कम्युनिटी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी या 7 राष्ट्रीय पक्षांना अज्ञातांकडून भरभरून दान मिळाले. एका वर्षात या पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या 70.98 टक्के इतकी कमाई झाली. विशेष म्हणजे अज्ञातांकडून मिळालेल्या एकूण पैशांमध्ये एकट्या भाजपला 78.24 टक्के लाभ झाला. भाजपने या आर्थिक वर्षात 2642.63 कोटींचे उत्पन्न अज्ञात स्रोतांकडून मिळाल्याचे जाहीर केले, तर काँग्रेसने 526 कोटी रुपये अज्ञात स्रोतांकडून प्राप्त झाल्याचे घोषित केले.

    पक्षांच्या आर्थिक व्यवहारांच्या कागदपत्रांची छाननी व्हावी
    राजकीय पक्षांच्या निधीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. यासाठी पक्षांकडून सादर केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या कागदपत्रांची पॅग आणि निवडणूक आयोगाची मान्यता असलेल्या समितीमार्फत प्रत्येक वर्षाला छाननी करण्यात यावी, तसेच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत सर्व माहिती पुरवलीच पाहिजे, असे ‘एडीआर’ने म्हटले आहे.