The second wave is worse than the first: when the little ones are vaccinated; If you want to keep children away from the corona ...

आर्थिक प्रभाव आणि आरोग्य सेवांवरील ताण यामुळे 128 देशात बालमृत्यूचे प्रमाण 7% वाढले.  निर्बंधामुळे गरीब-श्रीमंत, अधिकांश देशांच्या जीडीपीवर परिणाम झाला.  कोरोना संकटाला प्राधान्य दिल्यामुळे अन्य आरोग्य सुविधा कमी केल्या अथवा बंद केल्या.  जीडीपीवरील प्रभावामुळे एक हजार मुलांच्या मृत्यूदरात 0.23% वाढ झाली. या देशात लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट उद्भवले आणि संकटाचा सामना करण्यासाठी निधीच उपलब्ध नव्हता. यापूर्वीही करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे जगभरातील 1.2 ते 1.5 कोटी लोकं गरीबीच्या खाईत लोटले गेल्याचे समोर आले होते.

    दिल्ली : कोरोना विषाणूच बालकांवर थेट प्रभाव पडला नाही परंतु आर्थिक निर्बंधामुळे मात्र अनेक कोवळ्या निष्पाप जीवांचा जीव गेला असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी जे आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते त्यामुळे विकसित व गरीब देशात कमीत कमी 2,67,000 पेक्षा अधिक बालकांचा बळी गेला असावा असे जागतिक बँकेच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. गरीब आणि मध्यमर्गीयांवर आर्थिक निर्बंधाचा विपरित परिणाम झाला असून यामुळे आर्थिक असमानता आणि गरीबी तर वाढलीच शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यूंचीही सरासरी अधिक आहे.

    आर्थिक प्रभाव आणि आरोग्य सेवांवरील ताण यामुळे 128 देशात बालमृत्यूचे प्रमाण 7% वाढले.  निर्बंधामुळे गरीब-श्रीमंत, अधिकांश देशांच्या जीडीपीवर परिणाम झाला.  कोरोना संकटाला प्राधान्य दिल्यामुळे अन्य आरोग्य सुविधा कमी केल्या अथवा बंद केल्या.  जीडीपीवरील प्रभावामुळे एक हजार मुलांच्या मृत्यूदरात 0.23% वाढ झाली. या देशात लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट उद्भवले आणि संकटाचा सामना करण्यासाठी निधीच उपलब्ध नव्हता. यापूर्वीही करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे जगभरातील 1.2 ते 1.5 कोटी लोकं गरीबीच्या खाईत लोटले गेल्याचे समोर आले होते.

    देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या चोविस तासात देशात 37,593 नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. केरळातील कोरोना संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात एकूण वाढलेल्या रुग्णसंख्येपैकी अर्धी संख्या केरळातीलच आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 18.04% आहे.

    भारतामध्‍ये कोरोना साथरोग आता एंडेमिक स्‍टेजमध्‍ये आली आहे. एंडेमिक स्‍टेज म्‍हणजे, नागरिक संसर्गासह जगणे शिकू लागतात. मात्र संसर्गाचा स्‍तर हा कमी किंवा मध्‍यम अवस्‍थेत राहतो. याचा अर्थ देशात कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेसारखी भयावह परिस्‍थिती असणार नाही. मात्र संसर्ग पूर्णपणे कमी होणार नाही, असे मत डब्ल्यूएचओच्‍या मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. सौम्‍या स्‍वामीनाथन यांनी व्यक्त केले आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्‍यांतील लोकसंख्‍येची घनता आणि अन्‍य परिस्‍थितीमुळे एंडेमिक स्‍टेजमधील कोरोना रुग्‍णसंख्‍येचे स्‍वरुप कायम असेल, असे त्या म्हणाल्या.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]