पाक सीमेवर 270 कोटींचे हेरोईन जप्त; तस्कर पाकिस्तानकडे पळून गेले

राजस्थानात बीकानेर सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानी तस्करांविरोधात मोठी कारवाई केली. बीएसएफच्या जवानांनी 56 किलोहून अधिक हेरोईन जप्त केले. या अमली पदार्थांची किंमत तब्बल 270 कोटी रुपये असल्याचे समोर येत आहे. 2-3 जून रोजी रात्री उशिरा ड्युटीवर तैनात असणाऱ्या जवानांना तारेजवळ काही हालचाल होत असल्याचा संशय आला.

    दिल्ली : राजस्थानात बीकानेर सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानी तस्करांविरोधात मोठी कारवाई केली. बीएसएफच्या जवानांनी 56 किलोहून अधिक हेरोईन जप्त केले. या अमली पदार्थांची किंमत तब्बल 270 कोटी रुपये असल्याचे समोर येत आहे. 2-3 जून रोजी रात्री उशिरा ड्युटीवर तैनात असणाऱ्या जवानांना तारेजवळ काही हालचाल होत असल्याचा संशय आला.

    बीएसएफ जवांनानी शोधाशोध सुरू करत आवाजाच्या दिशेने फायरिंग केले. परंतु, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तस्कर पाकिस्तानकडे पळून गेले. या भागाच्या तपासणीत 54 पाकिटांत 56 किलो 630 ग्रॅम अमली पदार्थ आढळून आले. ही पाकीट बीएसएफ जवानांनी ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणाची बीएसएफनं नोंदही केलीय.

    राजस्थान सेक्टरचे महानिरीक्षक पंकज गुमर यांनी जवानांच्या सतर्कतेचे कौतुक केले आहे. याच वर्षी 7-8 फेब्रुवारी रोजी रात्री असाच एक घुसखोरीचा प्रकार सुरक्षा दलाने उधळला होता. तसेच बीकानेर सीमेवर 5 मार्च आणि 20 मार्च रोजी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका – एका घुसखोराला बीएसएफने टीपले होते.