employee

मागील काही महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने बुधवारी ‘गिफ्ट’ दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीसह थकबाकी देण्यास संमती दिली होती. नव्या निर्णयानुसार महागाई भत्त्यात तब्बल 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर गेला आहे.

    दिल्ली : मागील काही महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने बुधवारी ‘गिफ्ट’ दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीसह थकबाकी देण्यास संमती दिली होती. नव्या निर्णयानुसार महागाई भत्त्यात तब्बल 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर गेला आहे.

    सरकारने कोरोनामुळे महागाई भत्त्याला स्थगिती दिल्याने तीन हफ्ते प्रलंबित असून, सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या हातात घसघशीत पगार येणार आहे.
    केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापू्र्वी जुलै 2020 मध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. या भत्त्याचा लाभ सप्टेंबरपासून मिळणार आहे.