Important Document रेशन कार्ड; चेक करा तुमच्या कुटुंबातील कुणाचे नाव तर गायब झाले नाही ना?

सुप्रीम कोर्टात या विरोधात एक जनहित याचिका देखील दाखल झाली आहे. कोर्टाने सरकारकडून यावर उत्तर मागवले आहे. दरम्यान रेशन कार्ड रद्द झाले असल्यास किंवा कुटुंबातील व्यक्तींची नावं रद्द झाली असल्यास पून्हा यात नाव रजिस्टर करता येवू शकते.

    दिल्ली : रेशन कार्ड हा वास्तव्याच्या सर्वात मोठा पुरावा आहे. यामुळे रेशन कार्ड हे सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये ३ कोटी रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत. आधार लिंक नसल्याचे कारण सांगत ही रेशन कार्ड रद्द करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

    सुप्रीम कोर्टात या विरोधात एक जनहित याचिका देखील दाखल झाली आहे. कोर्टाने सरकारकडून यावर उत्तर मागवले आहे. दरम्यान रेशन कार्ड रद्द झाले असल्यास किंवा कुटुंबातील व्यक्तींची नावं रद्द झाली असल्यास पून्हा यात नाव रजिस्टर करता येवू शकते.

    रेशन कार्ड मधून नाव रद्द झाले असल्यास आधार कार्ड आणि आपले नाव ज्या रेशनकार्डमध्ये नोंदवायचे आहे, त्या कार्डची फोटो कॉपी घेऊन आपल्या जवळच्या सीएससी केंद्र किंवा जन सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. येथे मिळालेली रिसिट तहसीलमध्ये जमा करावी यांनतर काही दिवसात रेशन कार्डमध्ये पुन्हा तुमचे नाव जोडले जाईल.