धक्कादायक घटना! धावत्या गाडीत महिलेवर बलात्कार, दोन आरोपींना अटक

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, दोन आरोपींपैकी एका आरोपीच्या नावावर कारची नोंद करण्यात आली आहे. तसेच एका आरोपीची रोहित या नावाने ओळख करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहित आणि त्याचा सहकारी नितीनचा सुद्धा शोध लावला आहे.

    दिल्ली –  धावत्या गाडीत महिलेवर  बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी उत्तर दिल्लीमधील शास्त्री पार्क या विभागात घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच 1 तासाच्या आतच आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. तसेच तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपींवर कलम 376 आणि कलम 506 भारतीय दंड सहिता या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, दोन आरोपींपैकी एका आरोपीच्या नावावर कारची नोंद करण्यात आली आहे. तसेच एका आरोपीची रोहित या नावाने ओळख करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहित आणि त्याचा सहकारी नितीनचा सुद्धा शोध लावला आहे.

    पीडित महिला आणि आरोपी हे नोयडाचे निवासी आहेत. पीडित महिलेचं वय 35 आहे. रोहित आणि नितीन हे दोघेही बऱ्याच काळापासून चांगले सहकारी आणि मित्र आहेत. रोहितने पीडित महिलेला दिल्लीमध्ये एका नोकरीच्या बहाणयाने बोलावलं होतं. नितीन सुद्धा त्यावेळी रोहितसोबत उपस्थित होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

    दरम्यान, रोहित आणि नितीन या दोन्ही आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची कार जप्त करण्यात आली असून दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.