मुलांविरोधात दररोज ३५० गुन्हे; २०२० मध्ये एकूण १.२८ लाख गुन्ह्यांची नोंदणी

2020 मध्ये बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये 50 टक्के वाढ झाली. 2019 मध्ये बालविवाहाची 525 प्रकरणे समोर आली होती. जी 2020 मध्ये वाढून 785 झाली आहे. दुसरीकडे ऑनलाईन अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये 400 टक्के वाढ झाली आहे.

  दिल्ली (Delhi): देशात दररोज 350 मुले (children) कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांचे शिकार होत आहेत. 2020 मध्ये अशी एकूण 1,28,531 प्रकरणे नोंदविण्यात आली. ‘चाईल्ड राईट अँड यू’ने (Child Rights and You) एनसीआरबीच्या माहितीचा विश्लेषण अहवाल (NCRB data analysis report) सादर केला आहे. देशात मुलांच्या विरोधातील एकूण 49.1% गुन्हे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बंगाल व बिहार या 5 राज्यांमध्ये घडतात.

  गुन्ह्यांची प्रमुख कारणे आर्थिक चणचण, शाळा बंद होणे व कोरोनामुळे मानसिक दबाव ही आहेत. 2010 ते 2020 मध्ये मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये 381 टक्के वाढ झाली आहे. या दरम्यान एकूण अपराधांमध्ये फक्त 2.2टक्के वाढ झाली आहे.

  मुलांची वाढती असुरक्षितता (Growing insecurity of children)
  मानवतावादी संकटाच्या वेळी आलेल्या अनुभवांमधून असे दिसून आले आहे की, बालसंरक्षणाचे प्रश्न अधिक तीव्र होतात. कोविड दरम्यान शाळा बंद करणे, आर्थिक मंदीसह साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गतिशीलता प्रतिबंध असमानतेने उपजीविकेवर परिणाम झाला आणि अल्पभूधारक कुटुंबांची आर्थिक आणि अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. म्हणूनच, बालमजुरी, बालविवाह, बालतस्करी वाढतीवर आहे.

  तसेच लिंग-आधारित हिसाचाराच्या प्रकरणांमध्ये मुलांची असुरक्षा वाढवण्यास हातभार लावण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एनसीआयबीच्या आकडेवारीनुसार, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 अन्वये प्रकरणांमध्ये 2019 मध्ये 525 पासून 2020 मध्ये 785 पर्यंत सुमारे 50 टक्के वाढ झाली आहे. तथापि, बालकामगार (निषेध आणि नियमन) अधिनियम, 1986 अंतर्गत नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या 2019 मध्ये 770 प्रकरणांपेक्षा 38 टक्क्यांनी घटून 2020 मध्ये 476 प्रकरणे झाली.

  पाच राज्यांमध्ये 49.1 टक्के गुन्हेगारी (49.1% crime in five states)
  मध्यप्रदेश    –  13.2 टक्के
  उत्तर प्रदेश  –  11.8 टक्के
  महाराष्ट्र      –  11.1 टक्के
  बंगाल          –  7.9 टक्के
  बिहार           –  5.1 टक्के

  गुन्ह्यांची कारणे : (Reasons for offenses)
  – शाळा बंद होणे,
  – आर्थिक चणचण
  – कोरोनाविषयक मानसिक तणाव

  बालविवाहाच्या संख्येत वाढ (Increase in the number of child marriages)


  2020 मध्ये बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये 50 टक्के वाढ झाली. 2019 मध्ये बालविवाहाची 525 प्रकरणे समोर आली होती. जी 2020 मध्ये वाढून 785 झाली आहे. दुसरीकडे ऑनलाईन अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये 400 टक्के वाढ झाली आहे.

  दिल्लीच्या स्थानी बंगाल
  2019 च्या तुलनेत मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये सर्वांत वर असलेल्या 5 राज्यांमध्ये बंगालने दिल्लीचे स्थान घेतले आहे. येथे 2020 या वर्षात सर्वाधिक 63 टक्के प्रकरणे वाढली आहे.