भारतात खड्ड्यांनी घेतले 3500 बळी; 2020 मधील अपघाताची भयावह आकडेवारी

2019 मध्ये एकूण अपघातांची संख्या 4 टक्क्यांनी कमी होऊन ती 4,49,002 झाली. यात ओव्हरस्पीडिंगमुळे 3,19,028 अपघात, दारु पिऊन वाहन चालवण्यामुळे 12,256 अपघात झाले. तर गाडी चालवताना फोनच्या वापरामुळे 24,431 दुर्घटना झाल्या. पावसाळ्यात रस्त्यावर अधिक अपघात घडत असून रस्त्यावर पडणारे खड्डे पाण्याने भरलेले असतात. त्यामुळे हा खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज विशेषकरून दुचाकीस्वारांना येत नाही. त्यामुळे खड्ड्यामध्ये दुचाकी आदळते आणि अपघात होतात. काही रस्ते समतल नसल्यानेही दुचाकीचे घसरत असल्याचे दिसून येते.

    दिल्ली : भारतात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होतात. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 2020 मध्ये रस्ते अपघाताबाबतची आकडेवारी सांगितली. 2020 मध्ये खड्ड्यांमुळे देशात एकूण 3,564 रस्ते अपघात झाले. 2020 मधील अपघातांची ही आकडेवारी मागील पाच वर्षातील सर्वात कमी संख्या आहे. 2016 मध्ये केवळ खड्ड्यांमुळे 6424 अपघात झाले. 2017 मध्ये 9423, 2018 रोजी 4869 आणि 2019 मध्ये खड्ड्यांमुळे 4775 अपघात झाल्याची आकडेवारी केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

    2019 मध्ये एकूण अपघातांची संख्या 4 टक्क्यांनी कमी होऊन ती 4,49,002 झाली. यात ओव्हरस्पीडिंगमुळे 3,19,028 अपघात, दारु पिऊन वाहन चालवण्यामुळे 12,256 अपघात झाले. तर गाडी चालवताना फोनच्या वापरामुळे 24,431 दुर्घटना झाल्या. पावसाळ्यात रस्त्यावर अधिक अपघात घडत असून रस्त्यावर पडणारे खड्डे पाण्याने भरलेले असतात. त्यामुळे हा खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज विशेषकरून दुचाकीस्वारांना येत नाही. त्यामुळे खड्ड्यामध्ये दुचाकी आदळते आणि अपघात होतात. काही रस्ते समतल नसल्यानेही दुचाकीचे घसरत असल्याचे दिसून येते.

    अपघातांच्या कारणांबाबत बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले, की ऑटोमोबाईल डिझाईन, अधिक वेग, मोबाईल फोनचा वापर, ड्रिंक अँड ड्राईव्ह, वाहन ओव्हरलोड, वाहनांची खराब स्थिती आणि योग्यप्रकारे प्रकाश नसणे अशी अपघातांची कारणे असू शकतात. त्याशिवाय सिग्नल क्रॉस करणे, ओव्हरटेक करणे, खराब हवामान, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, रस्त्यांची खराब स्थिती, पायी चालणाऱ्या लोकांची चूक, वाहन चालकाची चूक अशा अनेक गोष्टी अपघातांसाठी कारणीभूत ठरू शकतात.

    गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाने शिक्षण, रस्ते आणि गाड्यांचं इंजिनिअरिंग आणि आपत्कालीन देखभाल या चार घटकांवर आधारित रस्ता सुरक्षेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी धोरण तयार केले आहे. नियोजनानुसार, रस्ता सुरक्षा हा रस्ते डिझाईनचा एक अविभाज्य भाग असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच राष्ट्रीय महामार्गांवर ब्लॅक स्पॉट किंवा अपघात प्रवण स्थळ ओळखणे, तसेच त्यात सुधारणा करणे याला प्राधान्य दिले आहे. तसंच सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी वाहनांची रचना आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांशी जुळण्याबाबतही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

    एकूण अपघातांपैकी 15 टक्के दुर्घटना या बेकायदेशीर परवान्याशिवाय वाहन चालविणे किंवा ड्रायव्हर न शिकल्यामुळे होतात. 2020 मध्ये शहरी व ग्रामीण भागात ठार झालेल्यांची संख्या अनुक्रमे 32.9 आणि 67.1 टक्के होती.