parents and children

देशात आतापर्यंत एकूण ३६३२ मुलांनी आपले आई आणि वडिल हे दोन्ही पालक गमावलेत. तर २६ हजार १७६ जणांनी आई किंवा वडिल यापैकी एक पालक गमावलाय. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट या संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आलीय. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर सर्व मिळून जवळपास ३० हजार मुलांना सरकारी मदतीची आणि संगोपनाची गरज असल्याचं या संस्थेनं म्हटलंय. 

    कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनं होत्याचं नव्हतं केलंय. या लाटेत जगभरात हजारो, लाखो नागरिकांचे प्राण गेले, अनेकांचे व्यवसाय बुडाले, अनेकजण देशोधडीला लागले. त्याचबरोबर अनेक चिमुकल्यांनी त्यांचे आईवडिल गमावले. शाळकरी वयातील अनेक बालकांच्या डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र हिरावलं गेल्यामुळे देशात हजारो मुलं आता अनाथ झालीयत.

    देशात आतापर्यंत एकूण ३६३२ मुलांनी आपले आई आणि वडिल हे दोन्ही पालक गमावलेत. तर २६ हजार १७६ जणांनी आई किंवा वडिल यापैकी एक पालक गमावलाय. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट या संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आलीय. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर सर्व मिळून जवळपास ३० हजार मुलांना सरकारी मदतीची आणि संगोपनाची गरज असल्याचं या संस्थेनं म्हटलंय.

    वेगवेगळ्या राज्यांनी जाहीर केलेल्या मृतांच्या तपशीलावरून ही आकडेवारी एकत्र केल्याचं या संस्थेचं म्हणणं आहे. यामध्ये कोरोनाव्यतिरिक्त इतर कारणांनी पालकांचा मृत्यु झाल्याच्या केसही असू शकतात. मात्र मुद्दा मुले अनाथ झाली आणि त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे, हा असल्याचं संस्थेनं म्हटलंय.

    ऍड. स्वरुपा चतुर्वेदी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आलीय. या ३० हजार मुलांपैकी बहुतांश मुलं ही १३ वर्षांच्या आतील असल्याची माहिती देण्यात आलीय. याबाबत सध्या सर्व घटकांशी चर्चा सुरू असून राज्य सरकारांनाही यात सामावून घेत असल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. याबाबत निश्चित धोरण ठरवण्यासाठी अधिक वेळ हवा, अशी विनंती केंद्र सरकारनं न्यायालयाला केलीय.