भारतात ०४ हजार कंपन्यांनाही लागणार टाळे! हजारो नोकऱ्या संकटात

अनेक वितरकांनी कर्मचारी कपातही सुरू केली आहे. दरम्यान, कंसोर्टियम ऑफ इंडियन असोसिएशन्सचे के. ई. रघुनाथन यांनी केवळ फोर्डच नव्हे तर 4000 पेक्षाही अधिक लहानमोठ्या कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती दिली.

  दिल्ली (Delhi) : अमेरिकेतील ऑटोमोबाईल कंपनी (US based automobile company) फोर्ड मोटर कंपनीने (Ford Motor Company) भारतातील आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनी आणि संबंधित वितरकांकडील हजारो कर्मचाऱ्यांसमोर रोजगारसंकट (an employment crisis) उद्भवले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (the Federation of Automobile Dealers Association) दिलेल्या माहितीनुसार, फोर्डचे जवळपास 170 वितरक भागीदार (distributor partners) असून त्यांचे देशभरात 400 शोरूम आहेत व येथे हजारो कर्मचारी (employees) कार्यरत आहेत.

  या निर्णयानंतर अनेक वितरकांनी कर्मचारी कपातही सुरू केली आहे. दरम्यान, कंसोर्टियम ऑफ इंडियन असोसिएशन्सचे (Consortium of Indian Associations) के. ई. रघुनाथन (K. E. Raghunathan) यांनी केवळ फोर्डच नव्हे तर 4000 पेक्षाही अधिक लहानमोठ्या कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती दिली.

  वितरकांनी केलेली गुंतवणूकही वांध्यात
  फोर्डने गाशा गुंडाळल्यानंतर सुटे भाग निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांवरही विपरित परिणाम होणार आहे. श्री पेरुम्बुदूरसारख्या ठिकाणी अनेक कंपन्या असून त्या फोर्डसाठी सुटे भाग निर्मितीचे काम करीत असतात. आता या निर्णयामुळे त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवरही गदा आली आहे. दुसरीकडे, कर्मचाऱ्यांनाही नवी नोकरी शोधणे अवघड जाणार आहे. फोर्डसाठी सुटे भाग बनविणाऱ्या तब्बल 275 कंपन्या असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

  एमएसएमईसमोर अडचणी (Difficulties facing MSME)
  फोर्डच्या कर्मचारी प्रशिक्षित असतात त्यामुळे त्यांना एमएसएमईमध्ये नोकरी मिळणे कठीण आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना अधिक वेतनमानाचीही अपेक्षा असेल ते देणेही एमएसएमईसाठी अशक्य आहे. मेट्रो शहरात वितरकांचे काम भागू शकते; परंतु लहान शहरंमध्ये मात्र महागडी कार विकणे व्यावहारिक पर्याय ठरणार नाही. प्राप्त माहितीनुसार, वितरकांकडे जवळपास 1000 वाहने उपलब्ध आहेत. त्यांची किंमतही जवळपास 150 कोटींच्या आसपास आहे. या वाहनांची विक्री करणेही सोपे नाही. कंपनी बंद होणार असल्यामुळे ग्राहकांमध्येही घबराट आहेच.

  ०३ अमेरिकी कंपन्या देशाबाहेर (03 US companies out of the country)
  गेल्या चार वर्षात अमेरिकेच्या तीन वाहन कंपन्यांनी भारतातील आपला गाशा गुंडाळला आहे. यापूर्वी जनरल मोटर्स, हर्ले डेव्हिडसन यांनीही मायदेशाची वाट धरली होती.