42 persons arrested from an illegal call centre from Peeragarhi

दिल्ली : दिल्ली पोलिसांनी पीरागढी येथील एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. याठिकाणी अवैधरित्या माहिती गोळा करुन अमेरिकेतील नागरीकांची फसवणुक केली जात होती.  फक्त बॉसलाच नाही तर स्टाफलाही माहित होते की ते खुप मोठा गु्न्हा करतायत. मात्र, तरी देखील ते हे काम करत होते.

या प्रकरणी कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या ४२ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ९० हून अधिक डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. तसेच ४.५ लाखांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

मोबाइल फोनद्वारे अमेरिका, कॅनडामधील नागरिकांना लक्ष्य करत, कोट्यवधी डॉलर्सना गंडविले आहे. महसूल सेवा, युएसए सिटिझनशिप किंवा इमिग्रेशन अधिकारी असल्याचे भासवून सरकारकडे थकबाकी रक्कम न भरल्यास अटक, तुरुंगवास, दंड, हद्दपारीची भीती घालून पैसे उकळत होते. यात, डाटा ब्रोकर आणि अन्य  स्रोतांकड़ून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही फसवणूक सुरू होती. बिटकॉइन्समार्फत पैसे हस्तांतरित करण्यासाठी धमकावले जात होते.

बॉसने या कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले होते. अधिकाअधिक लोकांना जाळ्यात ओढणाऱ्या कर्मचाऱ्याला चांगला मोबदला दिला जात होता. अखेरीस दिल्ली पोलिसांनी या कॉल सेंटरवर कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा
  • चिमुकल्याला