5000 assistance to rickshaw and taxi drivers Free ration for two months - Chief Minister Kejriwal's announcement

राजधानीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांसाठी दिल्ली सरकारने मंगळवारी दोन मोठे निर्णय घेतले. त्याअंतर्गत दिल्लीतील सुमारे ७२ लाख रेशनकार्डधारकांना दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५००० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशाच प्रकारच्या घोषणा केल्या आहेत.

  दिल्ली : राजधानीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांसाठी दिल्ली सरकारने मंगळवारी दोन मोठे निर्णय घेतले. त्याअंतर्गत दिल्लीतील सुमारे ७२ लाख रेशनकार्डधारकांना दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५००० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशाच प्रकारच्या घोषणा केल्या आहेत.

  दिल्लीत कडक लॉकडाउन केलेला असून, सलग दोनदा लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे रिक्षा व टॅक्सीचालकांना आर्थिक समस्यांना सामोर जावे लागत असल्याची बाब लक्षात घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५००० रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. या मदतीमुळे आर्थिक संकटात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना थोडा दिलासा मिळेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

  दिल्लीतील सुमारे ७२ लाख रेशनकार्डधारकांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाईल, परंतु याचा अर्थ असा नाही की कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन दोन महिने असेल. आर्थिक अडचणीत संघर्ष करणाऱ्या गरीब जनतेला मदत करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

  काय म्हणाले केजरीवाल?

  • ऑटो आणि टॅक्सी चालकांना ५-५ हजार रुपयांची मदत केली जाईल.
  • गेल्या लॉकडाऊनमध्ये दिल्ली सरकारने जवळपास १ लाख ५६ हजार चालकांची मदत केली होती.
  • सध्याचा कोरोनाचा काळ कठीण असून आपण सर्वजण यातून जात आहोत.
  • कोरोनची दुसरी लाट जास्त धोकादायक आहे.
  • सर्व लोकांना विनंती आहे की, सध्या एकमेकांची मदत करा. सर्व लोक कोणत्याही पार्टीचे असो, सर्वांनी मिळून मदत करावी. यावेळी कोणीही राजकारण करू नये.
  • आजारी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी, बेड न मिळाल्यास त्याची व्यवस्था करण्यास आणि ऑक्सिजन देण्यासाठी मदत करा.