The husband nodded, not even taking a selfie; Strange excuses for wives to divorce

दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण वाढतच चालल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. दिल्ली असो वा लखनौ, केरळ किंवा पंजाब, कोलकत्ता किंवा चेन्नई देशातील कुठलेही शहर यापासून बचावले नाही. घटस्फोटाचे प्रमाण जसे उच्च वर्गीय कुटुंबियांत पाहायला मिळत आहे तसेच प्रमाण मध्यम वर्गीयांमध्ये आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार गेल्याने पुढे काय करायचे? स्वतःसह कुटुंबाचे पोट भरायचे कसे? या विवंचनेत सापडलेल्या तब्बल 529 जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तसे तक्रारअर्ज त्यांनी पोलिसांच्या ‘भरोसा सेल’कडे दिले आहेत. विशेष म्हणजे ही जोडपी मागच्याच वर्षी विवाहबंधनात अडकली आहेत.

  दिल्ली : दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण वाढतच चालल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. दिल्ली असो वा लखनौ, केरळ किंवा पंजाब, कोलकत्ता किंवा चेन्नई देशातील कुठलेही शहर यापासून बचावले नाही. घटस्फोटाचे प्रमाण जसे उच्च वर्गीय कुटुंबियांत पाहायला मिळत आहे तसेच प्रमाण मध्यम वर्गीयांमध्ये आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार गेल्याने पुढे काय करायचे? स्वतःसह कुटुंबाचे पोट भरायचे कसे? या विवंचनेत सापडलेल्या तब्बल 529 जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तसे तक्रारअर्ज त्यांनी पोलिसांच्या ‘भरोसा सेल’कडे दिले आहेत. विशेष म्हणजे ही जोडपी मागच्याच वर्षी विवाहबंधनात अडकली आहेत.

  तक्रारअर्जापैकी 90 टक्के जोडप्यांचे विस्कटलेले संसार समुपदेशन करून पुन्हा फुलवण्याचे काम दिलासा सेलने केले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र विभक्त होण्याचे वेगळेच कारण समोर आले आहे. यावेळी सोशल मीडियावरील चॅटींग नव्हे, तर स्वतःसह कुटुंबाचे पोट भरायचे कसे या विवंचनेतून अनेक नवरा-बायको स्वतःहून विभक्त होण्यास तयार झाले आहेत. त्यात नवविवाहितांचे प्रमाण मोठे आहे. कोरोनाचे संकट जगभर आहे. त्यातून रोजगारासारखे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मात्र, घाबरून जाऊ नये. आपला संसार टिकून ठेवण्यासाठी लॉकडाउनकडे एक संधी म्हणून पहावे. नवा छंद जोपासावा, रोजगाराच्या नव्या वाटा शोधाव्यात.

  निर्माण झाला नोकरीचा प्रश्न

  पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेक पालकांनी आपल्या मुला-मुलींची लग्न घाईगडबडीत उरकून घेतली. मुलाला चांगली नोकरी आहे, असे सांगत ते गावभर हिंडले. परंतु, लॉकडाउन लागताच अनेकांना कंपन्यांनी घरचा रस्ता दाखवला. रोजगाराचा प्रश्न उपस्थित होताच नवरा-बायकोत भांडणे सुरू झाली. अखेर सोयीचा मार्ग म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे विदारक चित्र नगर जिल्ह्यात पहायला मिळत आहे.

  लॉकडाऊनमुळे समुपदेशनात अडचणी

  ‘‘दिलासा सेलमध्ये तक्रार अर्ज घेऊन आलेल्या नवरा-बायकोचे समुपदेशन करण्याचे काम आम्ही करतो. वरिष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन असते. मात्र, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने समुपदेशन करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. समुपदेशनाच्या तारखेसाठी संबंधितांना बोलावले जाते. मात्र, त्यांच्या कुटुंबातील कुणीतरी कोविड पॉझिटिव्ह असते, तर कोणाकडे येण्यासाठी पास नसतो, असे असतानाही आम्ही दररोज दहा-पंधरा जोडप्यांचे समुपदेशन करतो असे अहमदनगर येथील समुपदेशकांनी सांगीतले.