माकडांची केली कोरोना टेस्ट; 60 माकडांना केले 14 दिवसांसाठी क्वारंटाईन

दिल्ली वनविभागाने दक्षिण दिल्लीत पकडलेल्या 60 माकडांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले आहे. ज्या भागात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळली होती त्याच भागातून या माकडांना पकडण्यात आले होते.अभयारण्यातील अन्य प्राण्यांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सावधगिरीचा पर्याय म्हणून या माकडांना तुघलकाबाद येथील पशु बचाव केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तथापि पकडण्यात आलेल्या या माकडांपैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यांची अँटीजन चाचणीही निगेटिव्ह आली आहे.

    दिल्ली : दिल्ली वनविभागाने दक्षिण दिल्लीत पकडलेल्या 60 माकडांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले आहे. ज्या भागात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळली होती त्याच भागातून या माकडांना पकडण्यात आले होते.

    अभयारण्यातील अन्य प्राण्यांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सावधगिरीचा पर्याय म्हणून या माकडांना तुघलकाबाद येथील पशु बचाव केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तथापि पकडण्यात आलेल्या या माकडांपैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यांची अँटीजन चाचणीही निगेटिव्ह आली आहे.

    दरम्यान, 30 माकडांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला असून त्यांना असोला भाटी वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. या अभयारण्यात जवळपास 2500 माकडे आहेत.