शुक्रवारी देशात ६० हजार नवे कोरोना रुग्ण, १६४७ जणांचा मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या घटली

शुक्रवारी देशभरात कोरोनाच्या ६० हजार ७५३ नव्या रुग्णांची नोंद झालीय, तर १६४७ जणांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. सध्या ऍक्टिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या घटत असून हा आकडा आता ७ लाख ६० हजारांच्या घरात आला आहे.

    देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून गेल्या काही दिवसांपासून नव्याने आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णांची संख्या ही ७० हजारांच्याही खाली नोंदवली जात असल्याचं चित्र आहे. सक्रिय रुग्णसंख्येत हळूहळू घट होत असून नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होऊ घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या घटत असल्याची परिस्थिती आहे. ही देशासाठी दिलासादायक बाब असली, तरी नव्या रुग्णांचा आकडा अजूनही ५० हजारांच्या वर नोंदवला जातोय.

    शुक्रवारी देशभरात कोरोनाच्या ६० हजार ७५३ नव्या रुग्णांची नोंद झालीय, तर १६४७ जणांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. सध्या ऍक्टिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या घटत असून हा आकडा आता ७ लाख ६० हजारांच्या घरात आला आहे. देशात सध्या केरळमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर असून तिथे गेल्या २४ तासांत ११, ३६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. २४ तासांत १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होणारं केरळ हे एकमेव राज्य आहे.

    देशातील लसीकरणाचा वेग सध्या वाढत असून गेल्या तीन आठवड्यांपासून साप्ताहिक लसीकरणाच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचं चित्र आहे. देशात लसीच उपलब्ध नसल्याने आणि केंद्र सरकारने लसींचं बुकिंग न केल्याने गेल्या तीन महिन्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यात केंद्र सरकार लसीकरणाबाबत सतत धोरण बदलत असल्याचा परिणामही लसीकरण मोहिमेच्या वेगावर झाल्याचं दिसून येत होतं. मात्र आता ही परिस्थितीदेखील सुधारेल, अशी अपेक्षा आहे.

    दरम्यान, देशात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अधिक असून लवकरच दुसरी लाट संपेल, अशी शक्यता आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करणे सुरु ठेवावे, असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलंय.