90% effective against Novavax vaccine corona

अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली होती. ज्या अंतर्गत 200 कोटी लस निर्मिती केली जाणार होती. कंपनीने म्हटले की, लस करोनाविरोधात 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे व प्रारंभीच्या आकडेवारीनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही समोर आले आहे.

    दिल्ली : लसनिर्मिती करणारी कंपनी नोवाव्हॅक्सने त्यांची लस कोरोनाच्या व्हेरिअंट विरोधात 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचा दावा केला आहे. कंपनीने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

    अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली होती. ज्या अंतर्गत 200 कोटी लस निर्मिती केली जाणार होती. कंपनीने म्हटले की, लस करोनाविरोधात 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे व प्रारंभीच्या आकडेवारीनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही समोर आले आहे.

    नोवाव्हॅक्सच्या लसीबाबत ही माहिती अशावेळी समोर आली आहे, जेव्हा जगभरात करोना विरोधातील लशीची प्रचंड मागणी सुरू आहे. कंपनीने सांगितले की, सप्टेंबरच्या शेवटापर्यंत अमेरिका-युरोप व अन्य ठिकाणी लसीकरणासाठी या लशीला मंजुरी मिळवी या दिशेने प्रयत्न सुरू आहेत आणि तोपर्यंत एका महिन्यात दहा कोटी लस निर्मिती करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

    हे सुद्धा वाचा