90% चिनी सैनिक माघारी परतले पण… हेकेखोरपणा कायम

पूर्व लडाखमध्ये रक्त गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत भारतीय सैनिकांसोबत दोन हात करण्याच्या इराद्याने आलेल्या चिनी सैनिकांची निसर्गाने चांगलीच वाट लावली आहे. पूर्व लडाख सेक्टरमध्ये एलएसीवर तैनात असलेल्या चिनी सैनिकांचे कडाक्याच्या थंडीमुळे हाल होत असल्याने पिपल्स लिबरेशन आर्मीने 90% सैनिकांना माघारी बोलावले आहे. गेल्या वर्षी एप्रिल, मे नंतरच्या तणावामुळे चीनने भारतीय सीमा क्षेत्रात 50000 हून अधिक सैनिक तैनात केले होते. तथापि पँगांग सरोवर क्षेत्रात सैनिकांची माघार घेतल्यानंतरही चीनने तेथे सैनिक तैनातच ठेवलेले आहेत.

  दिल्ली : पूर्व लडाखमध्ये रक्त गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत भारतीय सैनिकांसोबत दोन हात करण्याच्या इराद्याने आलेल्या चिनी सैनिकांची निसर्गाने चांगलीच वाट लावली आहे. पूर्व लडाख सेक्टरमध्ये एलएसीवर तैनात असलेल्या चिनी सैनिकांचे कडाक्याच्या थंडीमुळे हाल होत असल्याने पिपल्स लिबरेशन आर्मीने 90% सैनिकांना माघारी बोलावले आहे. गेल्या वर्षी एप्रिल, मे नंतरच्या तणावामुळे चीनने भारतीय सीमा क्षेत्रात 50000 हून अधिक सैनिक तैनात केले होते. तथापि पँगांग सरोवर क्षेत्रात सैनिकांची माघार घेतल्यानंतरही चीनने तेथे सैनिक तैनातच ठेवलेले आहेत.

  हेकेखोरपणा कायम

  सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात चीनने पँगांग परिसरातील चिनी सैनिकांना माघारी बोलावले असले तरी तेथे अन्य सैनिकांची नियुक्ती केली आहे. या वातवरणाशी जुळवून घेणे जड जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. उंचीवरील भागात कठीण परिस्थिती आहे. यामुळे चीनचे सैनिक थंडी आणि अन्य कारणांनी खूप त्रस्त झाले आहेत. या परिसरातील टेकड्यांवरील सैनिकांना दररोज बदलत असल्याने त्यांच्या हालचालीही मंद झाल्या होत्या. होते. यामुळे त्यांच्या हालचाली खूप मंदावल्या होत्या.

  भारताचीही अदलाबदली

  दुसरीकडे भारत सरकारही आपल्या सैन्याला दोन वर्षांसाठी आपल्या जवानांना लडाखच्या उंच भागांत तैनात करतो. वर्षाला 40 ते 50% टक्के जवानांची अदलाबदलीही केली जाते. या परिस्थितीमुळे आयबीटीबी जवानांचा कार्यकाळही कधी कधी दोन वर्षांपेक्षा जास्त होतो.

  गोग्रा हॉट स्प्रिंगवर हट्ट कायम

  पँगांग सरोवर भागातून सैन्य माघारीची प्रक्रिया याच वर्षी पूर्ण झाली असली तरी चीनने पूर्व लडाखमधील गोग्रा आणि हॉट स्प्रिंग भागातून सैन्य माघारी बोलावण्याऐवजी हेकेखोरपणा कायम केला आहे. या भागातून सैन्य माघारी घेणार नसल्याचे सांगत या मुद्यावर तोडगाच न काढण्याची भूमिका अंगिकारली आहे. येथील मुद्यावर भारत-चीनमध्ये कमांडरस्तरीय चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या होत्या.

  दोन्ही देशांचे 50000 जवान तैनात

  एप्रिल 2020ची पूर्वस्थिती कायम न ठेवण्याचा चीनचा हट्ट आहे. देपसांग येथेही चिनी सैनिकांची मोठ्या प्रमाणात तैनाती करण्यात आल्याने भारतीय सैनिकांचे आवागमन बाधित झाले आहे. यात पेट्रोलिं पॉइंट 10, 11, 11-ए, 12 आणि 13 चा समावेश आहे.

  चर्चेच्या 11 फेऱ्या व्यर्थच

  दोन्ही देशांमध्ये गेल्यावर्षी 6 जूनपासून आजवर 11वेळा कमांडर स्तरीय चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. तथापि ज्या जागेवर वाद आहे त्या जागेवरून सैनिकांच्या माघारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हॉट स्प्रिंग, गोगरा आणि देपसांग येथील चर्चेत अद्यापही तोडगाच निघालेला नाही.