pmo

मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी रघुराज राजेंद्रन यांना पीएमओमध्ये संचालक आणि आंध्र प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आम्रपाली काटा यांना उपसचिव म्हणून जबाबदारी नेण्यात आली.

दिल्ली : पंतप्रधान कार्यालयातील (Prime Minister’s Office) ३ आएएस अधिकाऱ्यांवर ( IAS officers) मोठी जबाबदारी (responsibility) देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने तिघांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. यामध्ये उत्तराखंडच्या टिहरीचे डीएम मंगेश घिल्डियाल देखील आहेत. त्यांना पंतप्रधान कार्यालयातील अप्पर सचिब पदावर नियुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी वैयक्तिक आणि प्रशिक्षण विभागाने उत्तराखंडच्या मुख्य सचिवांना १२ सप्टेंबरला एक पत्र पाठविले आहे. त्याशिवाय मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी रघुराज राजेंद्रन यांना पीएमओमध्ये संचालक आणि आंध्र प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आम्रपाली काटा यांना उपसचिव म्हणून जबाबदारी नेण्यात आली.

पंतप्रधान कार्यालयामध्ये टिहरीचे डीएम

घिल्डियाल हे यापूर्वी रुद्रप्रयाग जिह्याचे डीएम होते. ते केदारनाथच्या पूनर्बांधणी आणि चार धाम रोडच्या बांधकामाशी संबंधित काम पाहत होते. हे दोन्ही प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केले.

मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी रघुराज राजेंद्रन

त्याचप्रमाणे मध्य प्रदेश केडरच्या २००४ बॅचचे रघुराज राजेद्रन यांची पीएमओमध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते पेट्रोलियम व नैसर्गिक वायूचे खासगी सचिव आणि पोलाद कॅबिनेट मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली स्टील मंत्रालयात काम केले आहे.

आंध्र प्रदेश केडर अधिकारी आम्रपाली काटा

आम्रपाली काटा हे आंध्र प्रदेश केडरच्या २०१०च्या बॅचमधील आयएएस अधिकारी आहेत. पीएमओमध्ये त्यांची उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे.