Charge filed against Sharjeel Usmani for claiming that Hindu society has become a street; The provocative speech was made at the Elgar conference

३० जानेवारी रोजी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारी, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली. ‘आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो’, अशाप्रकारची ही गंभीर विधाने केली होती. यावरुन चांगलाच वादंग माजला होता.

    दिल्ली : भाजपा नेत्याने केलेल्या तक्रारीवरून अलिगड विद्यापीठातील विद्यार्थी नेता शरजील उस्मानीवर पुण्यातील दुसऱ्या एल्गार परिषदेतील वादग्रस्त विधानाप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरजील उस्मानीवर आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी जालन्यातही दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर्षाच्या सुरुवातीला पुणे पोलिसांनी शरजील उस्मानीविरोधात चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

    ३० जानेवारी रोजी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारी, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली. ‘आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो’, अशाप्रकारची ही गंभीर विधाने केली होती. यावरुन चांगलाच वादंग माजला होता.

    स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत उस्मानी याने प्रक्षोक्षक भाषण करून भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार उस्मानीने केलेल्या भाषणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर उस्मानीविरोधात भादंवि १५३ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.