दिल्लीतील CBI मुख्यालयाला लागली आग, इमारतीमध्ये धुराचे लोट ; अग्निशमन दलाचे ५ बंब दाखल

नवी दिल्लीतील केंद्रीय तपास संस्था सीबीआय (CBI) च्या मुख्यालयाला गुरुवारी सकाळी आग लागली. अचानक आग लागल्याने सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर आले आहेत.

    नवी दिल्लीतील केंद्रीय तपास संस्था सीबीआय (CBI) च्या मुख्यालयाला गुरुवारी सकाळी आग लागली. अचानक आग लागल्याने सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर आले आहेत. इमारतीमध्ये धुराचे लोट असून अग्निशामन दल पोहोचले आहेत.

    अग्निशामन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. सीबीआयचे हे कार्यालय दिल्लीच्या लोधी रोडवर आहे. आग कशी लागली, कोणत्या फ्लोअरवर लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.