स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचे दर

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली होती.आज सोन्याच्या किंमतीत प्रति ग्रॅम दहा रुपयांनी घट झाली आहे. यासह, 22 कॅरेटचा दर 47,950 वर आला तर 24 कॅरेटची किंमत खाली 48,950 वर आली.

  नवी दिल्ली : शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा एकदा खाली आल्या आहेत. या आठवड्यात सोन्याच्या किंमती सलग 4 दिवस कमी होताना दिसत आहेत. जर पाहिले तर सोन्याच्या विक्रमी उच्चांपेक्षा 8,000 रुपयांनी स्वस्त दर आहे.

  गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली होती.आज सोन्याच्या किंमतीत प्रति ग्रॅम दहा रुपयांनी घट झाली आहे. यासह, 22 कॅरेटचा दर 47,950 वर आला तर 24 कॅरेटची किंमत खाली 48,950 वर आली.

  22 कॅरेट सोन्याची किंमत

  दिल्लीमध्ये प्रति 10 ग्रॅम 46,690 रुपये आहे.

  मुंबईत प्रति 10 ग्रॅम 47,950 रुपये आहे.

  24 कॅरेट सोन्याची किंमत

  दिल्लीमध्ये दर प्रति 10 ग्रॅम 50,890 रुपये आहे.

  मुंबईत प्रति 10 ग्रॅम 48,950 रुपये आहे.