दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाला लागली भीषण आग

पहिल्या मजल्यावरील औषध विभागात सकाळी ६.३५ वाजता आग लागली होती. ही आग पसरत पुढे रुग्णालयातील एच ब्लॉक वॉर्ड ११ पर्यंत पोहोचली. मात्र याआधीच या वॉर्डमधील ५० रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले. दरम्यान, ही आग विझविली गेली असून सर्व लोक सुरक्षित आहे.

    दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या मजल्यावरील औषध विभागात सकाळी ६.३५ वाजता आग लागली होती. ही आग पसरत पुढे रुग्णालयातील एच ब्लॉक वॉर्ड ११ पर्यंत पोहोचली. मात्र याआधीच या वॉर्डमधील ५० रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले. दरम्यान, ही आग विझविली गेली असून सर्व लोक सुरक्षित आहे.

    या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाचे ९ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. या दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ५० रुग्णांना दुरीकडे हलवले होते. ही आग विझवण्यात आली असून सर्व सुखरूप आहे.