राजधानी दिल्लीत कपड्यांच्या शोरूमला भीषण आग, अग्निशमनदलाच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल

सेंट्रल मार्केटच्या केएफसीजवळील कपड्यांच्या शोरूमला आग लागली आहे. कपड्यांमुळे आगीने रौद्र रूप धारण केलं आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडलेली नाहीये.

    राजधानी दिल्लीतील लाजपत नगरमधील कपड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली असता अग्निशमनदलाच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दिल्लीतली ही सर्वात मोठी आग आहे.

    सेंट्रल मार्केटच्या केएफसीजवळील कपड्यांच्या शोरूमला आग लागली आहे. कपड्यांमुळे आगीने रौद्र रूप धारण केलं आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडलेली नाहीये.

    पाच मोठी कपड्यांची दुकानं आगीच्या विळख्यात सापडली आहेत. बाटला हँडलूम, संगम साडी आणि रेमंड अशी तीन आणखी दोन मोठ्या दुकानांचा समावेश यामध्ये आहे.