धक्कादायक… मुलानेच घेतला आईचा बळी, कानशिलात लगावताच खाली कोसळून माऊलीचा मृत्यू, VIDEO व्हायरल

ही घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीतील द्वारका परिसरात एका ४५ वर्षीय मुलाने त्याच्या ७६ वर्षीय वृद्ध आईला कानशिलात लगावली. त्यानंतर ती धाडकन खाली कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका परिसरातील एका विवाहित मुलाने आपल्या वृद्ध आईच्या कानाखाली मारल्याने त्या खाली कोसळल्या. या दुर्देवी घटनेमध्ये त्या माऊलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

    नवी दिल्ली : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु आता एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो म्हणजे आई-मुलाच्या पवित्रा नात्याला काळीमा फासणारा आणि चित्तथरारक असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून मुलाला पोलिसांकडे अटक करत कठोर शिक्षा देण्यात यावी, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

    ही घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीतील द्वारका परिसरात एका ४५ वर्षीय मुलाने त्याच्या ७६ वर्षीय वृद्ध आईला कानशिलात लगावली. त्यानंतर ती धाडकन खाली कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका परिसरातील एका विवाहित मुलाने आपल्या वृद्ध आईच्या कानाखाली मारल्याने त्या खाली कोसळल्या. या दुर्देवी घटनेमध्ये त्या माऊलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत माऊलीचं नाव अवतार कौर असं आहे. ही घटना घडण्यापूर्वी अवतार कौर आणि त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये पार्किंगवरून वाद झाला होता. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना देखील कळवले होते. परंतु पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच त्यांच्यातील वाद मिटल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, माऊलीचा मुलगा रणबीरने झालेल्या वादा संदर्भात विचारणा केली. त्यावेळी आई आणि मुलांमध्ये वाद होऊन त्याने रागाच्या भरात आईच्या कानशिलात लगावली. या जोरदार फटक्याने खाली कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला.

    दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या अवतार यांच्या सुनेने आणि मुलाने त्यांना रूग्णालयात दाखल केले. परंतु रूग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. येथील बिंदापूर पोलिसांनी रणबीर याच्याविरूद्ध भारतीय दंड सहिता कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.