कानशिलात मारल्याचा रागातून अल्पवयीन मुलीचा केला कुऱ्हाडीने खून

या घटनेनंतर प्रदीपच्या मनात राग निर्माण झाला आणि त्याने सूड घेण्याची योजना आखली. त्यासाठी आर के पुरम येथून कुर्हाड खरेदी केली होती. त्यानंतर तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    नवी दिल्ली: रागाच्या भरात केलेलं कोणतेही कृत्याचा त्या व्यक्तीला पश्चातापचं होतो. अशीच एक धक्कादायक घटना शास्त्रीपार्क झोपडट्टीतून समोर आली आहे. २१ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा कुऱ्हाडीने जीवे मारण्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मुलीच्या वडिलांचा सूड उगवण्यासाठी ही घटना घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी यापूर्वी मुलीचा पाठलाग करत होता. हा आरोपी आपल्या मुलीचा पाठलाग करतोय यामुळे वडिलांनी रागाच्या भरात २१ वर्षाच्या या मुलाला कानशिलात मारली.

    २१ वर्षीय तरूण आरोपी काही महिन्यांपासून १६ वर्षाच्या मुलीचा पाठलाग करीत होता आणि याची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी त्याला रागाच्या भरात कानशिलात लगावली. या घटनेनंतर प्रदीपच्या मनात राग निर्माण झाला आणि त्याने सूड घेण्याची योजना आखली. त्यासाठी आर के पुरम येथून कुर्हाड खरेदी केली होती. त्यानंतर तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिचा मृत्यू झाला. प्रदीपला हरियाणाच्या पलवल येथील आपल्या बहिणीच्या घरातून अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंडित प्रताप सिंह यांनी दिली.