covaxin

कोव्हॅक्सिन लसीबाबत काँग्रेस नेत्याने धक्कादायक असा दावा केला आहे. कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी गायीच्या वासराच्या रक्तातील अंश वापरला जातो असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहिताचा दाखला दिला आहे. लस तयार करण्यासाठी 20 दिवसांपेक्षा कमी वयाच्या वासराची हत्या केली जाते असाही दावा त्यांनी केला. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पांधी यांनी ट्विटरवर असा दावा करताना आरटीआय अंतर्गत मिळालेली माहितीसुद्धा शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की, आरटीआयने दिलेले उत्तर हे विकास पाटनी नावाच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नावर सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने उत्तर दिले आहे.

    दिल्ली : कोव्हॅक्सिन लसीबाबत काँग्रेस नेत्याने धक्कादायक असा दावा केला आहे. कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी गायीच्या वासराच्या रक्तातील अंश वापरला जातो असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहिताचा दाखला दिला आहे. लस तयार करण्यासाठी 20 दिवसांपेक्षा कमी वयाच्या वासराची हत्या केली जाते असाही दावा त्यांनी केला. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पांधी यांनी ट्विटरवर असा दावा करताना आरटीआय अंतर्गत मिळालेली माहितीसुद्धा शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की, आरटीआयने दिलेले उत्तर हे विकास पाटनी नावाच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नावर सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने उत्तर दिले आहे.

    दरम्यान, वासराच्या रक्ताचा अंश हा विरो सेल्सच्या रिवायव्हल प्रोसेससाठी केला जातो. विरो सेल्सचा वापर कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी होत आहे. मात्र त्याचा अंश लसीमध्ये आहे असे म्हणता येणार नाही असे स्पष्टीकरण केंद्राने दिले आहे. या विरो सेल्सची वाढ झाल्यानंतर ते स्वच्छ केले जातात. त्यावर वासराच्या सीरमचा अंशही ठेवला जात नाही. त्यानंतर हे विरो सेल्स कोरोना व्हायरसने व्हायरल ग्रोथसाठी इन्फेक्टे केले जातात.

    व्हायरल ग्रोथच्या प्रक्रियेत विरो सेल्स पूर्णपणे नष्ट होतात. त्यानंतर हा व्हायरसही निष्क्रिय आणि शुद्ध केला जातो. हा निष्क्रिय व्हायरस लशीसाठी वापरला जातो. लशीच्या शेवटच्या फॉर्म्युल्यात वासराच्या सीरमचा वापर होत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.