भारतात एकूण 3 कोटी 90 लाख वेळा पडली वीज; माहित आहे का ढगात कशी निर्माण होते वीज?

भारतात 2019 च्या तुलनेत गेल्यावर्षी वीज पडण्याच्या घटनांमध्ये 23% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये वीज पडण्याच्या अधिक घटना घडल्याचे समोर आले आहे. बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड व महाराष्ट्रात वीज पडल्यामुळे सर्वाधिक लोकांचे प्राण गेले आहेत. 'द अर्थ नेटवर्क्स' ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार भारतात 3 कोटी 90 लाखांपेक्षा अधिकवेळा वीज पडली. ज्यात एक कोटींपेक्षा अधिकवेळा वीज जमिनीला धडकली आहे. वीज जमिनीवर पडल्यानंतर प्राणहानीची शक्यता अधिक असते.

  दिल्ली : भारतात 2019 च्या तुलनेत गेल्यावर्षी वीज पडण्याच्या घटनांमध्ये 23% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये वीज पडण्याच्या अधिक घटना घडल्याचे समोर आले आहे. बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड व महाराष्ट्रात वीज पडल्यामुळे सर्वाधिक लोकांचे प्राण गेले आहेत. ‘द अर्थ नेटवर्क्स’ ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार भारतात 3 कोटी 90 लाखांपेक्षा अधिकवेळा वीज पडली. ज्यात एक कोटींपेक्षा अधिकवेळा वीज जमिनीला धडकली आहे. वीज जमिनीवर पडल्यानंतर प्राणहानीची शक्यता अधिक असते.

  राज्यनिहाय मृत्यूचे प्रमाण

  जानेवारीमध्ये हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या 2020 चा अहवालानुसार गर्जना व वीज पडल्याच्या घटनांमुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात 815 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यात बिहारमधील 280, उत्तरप्रदेशमधील 220, झारखंडमधील 122, मध्यप्रदेशमधील 72, महाराष्ट्रातील 23 व आंध्रप्रदेशातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. द अर्थ नेटवर्क्सच्या कुमार मार्गसहायम यांनी सांगितले ही संख्या खूप असल्याचे सांगितले. लोकांना वेळेवर हवामानाविषयी अलर्ट मिळणे व त्याविषयीच्या जागृकतेमुळे लेाकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात.

  समस्येवर काम करण्याची गरज

  अर्थ नेटवर्क्सके दावा केला आहे की, संपूर्ण भारतात वेगवेगळ्या केंद्रीय व राज्य संस्था, विद्यापीठे व खासगी उद्योगांनी एकत्र येऊन यावर काम करणे आवश्यक आहे. सरकारी संस्थांसारख्या भारतीय सशस्त्र दल, पृथ्वी विज्ञान मंत्रालय व उत्तर-पूर्व अवकाश अनुप्रयोग केंद्र (एनईएसएसी) हवामानाविषयी आपली तयारीला पूर्ण करण्यासाठी अर्थ नेटवर्क्सच्या लायटनिंग सेन्सर व त्याच्या डेटाचा उपयोग करतात.

  अशी निर्माण होते वीज

  जेव्हा थंड हवेचे ढग तयार होतात तेव्हा खाली ढगांच्या आत उबदार हवेच्या हालचालीमुळे आणि थंड हवेमुळे ढगांमधील सकारात्मक प्रभार वरच्या दिशेने व नकारात्मक प्रभार खाली दिशेने होते. ढगांमधील या विरुद्ध प्रभाराच्या कृतीमुळे इलेक्ट्रिक प्रभार निर्माण होते. अशाप्रकारे आकाशीय वीज निर्माण होते. पृथ्वीवर पोहोचताच वीज चांगल्या वाहकाचा शोध घेते, ज्यातून तिचे वहन चांगल्या पद्धतीने होईल. यासाठी धातू किंवा वृक्ष उपयुक्त ठरतात. त्यामुळेच नेहमीच वीज या माध्यमातून पृथ्वीवर पडण्याचा मार्ग निवडते.