विंचू चावला काय मी करू… दंश करताना विंचवानं बाहेर सोडलं विष, VIDEO पाहूण तुम्हीही व्हाल हैराण

सध्या सोशल मीडियावर एका काळ्या रंगाच्या विंचाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हा विंचू आपलं विष कसं बाहेर सोडतो हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच लोक हैराण झाले आहेत.

    नवी दिल्ली : जंगलात आपल्याला विविध प्रकारचे जीव पाहायला मिळतात. यामध्ये सर्वात घातक आणि विषारी असणारा जीव म्हणजे विंचू… विषारी शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा चित्र उभं राहतं ते सापाचं. मात्र, आज आम्ही ज्या विषारी जीवाबद्दल बोलत आहोत तो विंचू (Scorpion) आहे.

    सध्या सोशल मीडियावर एका काळ्या रंगाच्या विंचाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हा विंचू आपलं विष कसं बाहेर सोडतो हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच लोक हैराण झाले आहेत.

    व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की काळ्या रंगाचा हा विंचू चावा घेण्यासाठी आधी पोजिशनमध्ये येतो. यानंतर अचानक तो एका झटक्यात विषाची धार सोडतो. या व्हिडिओला लोकांकडून प्रचंड लाईक्स आणि प्रतिसाद मिळत आहे.