नोव्हेंबरमध्येच दिला होता ऑक्सिजन उत्पादन वाढविण्याचा सल्ला; संसदीय समितीने सरकारला केले होते सावध

संसदेच्या एका स्थायी समितीने कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीच सरकारला रुग्णालयात बेडची संख्या आणि ऑक्सिजन उत्पादन वाढविण्याचा प्रस्ताव दिला होता. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या आरोग्य समितीने एका अहलवात याबाबत शिफारस केली होती की नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला (एनपीपीए) ऑक्सिजन सिलेंडरची किंमत निश्चित करणे आणि किफायती दरात उपलब्ध करून देण्याची शिफारसही समितीने केली होती.

    दिल्ली : संसदेच्या एका स्थायी समितीने कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीच सरकारला रुग्णालयात बेडची संख्या आणि ऑक्सिजन उत्पादन वाढविण्याचा प्रस्ताव दिला होता. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या आरोग्य समितीने एका अहलवात याबाबत शिफारस केली होती की नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला (एनपीपीए) ऑक्सिजन सिलेंडरची किंमत निश्चित करणे आणि किफायती दरात उपलब्ध करून देण्याची शिफारसही समितीने केली होती.

    बेड वाढविण्यावरही दिला होता भर

    संसदेच्या आरोग्य समितीत भाजपाच्या 16 सदस्यांचाही समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यातच सादर करण्यात आलेल्या अहवालात सरकारने ऑक्सिजन उत्पादनाला प्रोत्साहन द्यावे आणि रुग्मालयात त्याचा पुरवठा निश्चित करण्याची शिफारस केली होती. या अहवालात कोरोना रुग्णांची संभाव्य वाढती संख्या पाहू जाता सरकारी रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात आला होता.

    नियंत्रण मिळविण्यात अडसर

    रुग्णालयात बेड आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळेच कोरोना साथरोगावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांत अडसर निर्माण होत असल्याचे समितीने म्हटले होते. वाढती रुग्णसंख्या, बेडची कमतरता यामुळे रुग्णालयात बेडसाठी धावाधाव होत असल्याकडेही उल्लेख केला होता. बेड नसल्यामुळे रुग्णालयातून आल्या पावली परत जाणे नित्याचीच बाब झाली होती. पाटणा येथे तर ऑक्सिजन सिलिंडरपासून बेडच्या शोधार्थ रुग्ण भटकत होते. आरोग्य यंत्रणेच्या दयनीय अवस्थेचा उल्लेख करीत समितीने आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याचा व आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण करण्याची शिफारस केली होती.