बोगद्याचा प्रतीकात्मक फोटो
बोगद्याचा प्रतीकात्मक फोटो

दिल्ली (Delhi Delhi ).  काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणाऱ्या 'अटल बोगद्या'चे लोकार्पण केले होते. त्यानंतर आता लेहला काश्मीरशी जोडण्यासाठी जोझिला बोगदा निर्मितीचे कामही सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे पहिला सुरूंग स्फोट केला. हा बोगदा श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय राजमार्गावर 11,578 फूट उंच आणि 14.15 लांब आहे. जोझिला खिंडीला पोखरून हा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

दिल्ली (Delhi Delhi ).  काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणाऱ्या ‘अटल बोगद्या’चे लोकार्पण केले होते. त्यानंतर आता लेहला काश्मीरशी जोडण्यासाठी जोझिला बोगदा निर्मितीचे कामही सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे पहिला सुरूंग स्फोट केला. हा बोगदा श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय राजमार्गावर 11,578 फूट उंच आणि 14.15 लांब आहे. जोझिला खिंडीला पोखरून हा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

सध्या चीन आणि भारतादरम्यान तणावाचे वातावरण आहे. यातच जोझिला बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जोझिला बोगदा सैन्यासाठी म्हत्त्वपूर्ण आहे. यामुळे प्रवासाचा वेग कमी होणार असून, तो सुरक्षितही असणार आहे. सध्या या भागात सहा महिनेच वाहतूक सुरू असते. बर्फवृष्टीमुळे येथील रस्ता बंद असतो. या बोगद्यामुळे ही समस्या दूर होणार असून सैन्याची वाहतूक जलद आणि सोपी होणार आहे. या बोगद्यामुळे प्रवासाचा कालावधी ३ तासांवरून फक्त १५ मिनिटांवर येणार आहे. जोझिला बोगदा प्रकल्प २०१३ मध्ये युपीएच्या काळात मंजूर झाला होता. हा बोगदा २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या बोगद्याच्या बांधकामाचा खर्च सुमारे ६८०८.६३ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. बोगद्याच्या निर्माणासाठी ६ वर्षांचा वेळ लागणार आहे.