बॉलिवूडच्या समर्थनार्थ जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगनाला सुनावलं

बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini ) यांनी जया बच्चन यांचं समर्थनं केलं आहे. फक्त बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येच ड्रग्सचा वापर होतो हे कसं बोलता? जगात अनेक क्षेत्र आहेत. ज्याठिकाणी ड्रग्स वापरलं जातं. बॉलिवूडमध्ये कोणी ड्रग्सचा वापर करत असेल याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे असं होत नाही. ज्यारितीने लोक बॉलिवूडला निशाणा बनवत आहेत. हे चुकीचं आहे. योग्य नाही असं अभिनेत्री हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

 नवी दिल्ली : लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्याच (Monsoon Session) दिवशी भाजपा खासदार रवी किशनने ( Ravi Kishan) बॉलिवूड आणि ड्रग्स तस्करी (Drugs Case) संदर्भातील मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. या मुद्द्यावर समाजवादी पक्ष्याच्या खासदार जया बच्चन यांनी विरोध करत राज्यसभेत यावर भाष्य केलं. काही लोक बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहेत. तसेच ज्या ताटात तुम्ही खाता, त्याच ताटात तुम्ही छिद्रही करायचं हे चुकीचे आहे. असे म्हणत जया बच्चन  (Jaya Bachchan) यांनी रवी किशन यांना अप्रत्यक्षपणे फटकारलं होतें.

या वक्तव्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini ) यांनी जया बच्चन यांचं समर्थनं केलं आहे. फक्त बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येच ड्रग्सचा वापर होतो हे कसं बोलता? जगात अनेक क्षेत्र आहेत. ज्याठिकाणी ड्रग्स वापरलं जातं. बॉलिवूडमध्ये कोणी ड्रग्सचा वापर करत असेल याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे असं होत नाही. ज्यारितीने लोक बॉलिवूडला निशाणा बनवत आहेत. हे चुकीचं आहे. योग्य नाही असं अभिनेत्री हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेकडूनही जया बच्चन यांचे समर्थन :

हिंदी सिनेसृष्टीने जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केलेला आहे. हॉलिवूडच्या बरोबरीने बॉलिवूडचे नाव घेतले जाते. उद्योगात जसे टाट, बिर्ला, नारायण मूर्ती आहेत. तसेच नीरव मोदी आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीच्याबाबतीतही तसेच म्हणावे लागेल. सब घोडे बारा टके, असे म्हणणे हा सच्चा कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली आहे. त्यातून आता किती कलाकारांना कंठ फुटतो ते पाहू, असे शिवसेनेने म्हटले आहे.