लडाखनंतर आता उत्तराखंडमध्ये LAC जवळ चीनच्या हालचाली वाढल्या

अलीकडेच या भागात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (People's Liberation Army) सैनिकांची एक तुकडी सक्रिय असल्याचं दिसलं होतं. मिळालेल्या  माहितीनुसार, 'चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 35 सैनिकांची एक प्लाटून उत्तराखंड राज्याच्या बाराहोटी परिसरात सर्वेक्षण करताना अलीकडेच दिसून आली.

    नवी दिल्ली :  भारत-चीन या देशांमध्ये (India-China Standoff) तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आता चिनी सैन्याने उत्तराखंड (Uttarakhand) राज्याच्या बाराहोटी (Barahoti) भागात प्रत्यक्ष ताबारेषेच्या (Line of Actual Control) जवळ आपल्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढवल्या आहेत.

    अलीकडेच या भागात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (People’s Liberation Army) सैनिकांची एक तुकडी सक्रिय असल्याचं दिसलं होतं. मिळालेल्या  माहितीनुसार, ‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 35 सैनिकांची एक प्लाटून उत्तराखंड राज्याच्या बाराहोटी परिसरात सर्वेक्षण करताना अलीकडेच दिसून आली.

    या भागात काही वेळाच्या अंतराने चिनी सैनिकांच्या (Chinese Army) काही हालचाली सुरू होत्या. तसंच या भागाचं सर्वेक्षणही (Survey) त्यांच्याकडून केलं जात होतं, असंही सांगण्यात येत आहे. चीनच्या सुरक्षा व्यवस्थेकडे पाहता या भागात काही कृत्य करण्याचा त्यांचा इरादा असल्याचं वाटत आहे.