Agitation of farmers' organizations against agricultural laws; Indicates to farmers to fight long-range battles

केंद्र सरकारद्वारे पारित करण्यात आलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन(protest against farm laws) सुरूच आहे. गुरुवारी पंजाबमधून निघालेल्या शेतकऱ्यांनी हरयाणामार्गे दिल्लीकडे कूच केले परंतु पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखून धरले. या ठिकाणी पोलिसांसोबत त्यांची चकमकही झाली परंतु माघार घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. हे शेतकरी आपल्यासोबत ट्रकभर रेशनही घेऊन आले असून लांब पल्ल्याची लढाई लढण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.

दिल्ली : केंद्र सरकारद्वारे पारित करण्यात आलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन(protest against farm laws) सुरूच आहे. गुरुवारी पंजाबमधून निघालेल्या शेतकऱ्यांनी हरयाणामार्गे दिल्लीकडे कूच केले परंतु पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखून धरले. या ठिकाणी पोलिसांसोबत त्यांची चकमकही झाली परंतु माघार घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. हे शेतकरी आपल्यासोबत ट्रकभर रेशनही घेऊन आले असून लांब पल्ल्याची लढाई लढण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. त्यांच्याकडे धान्य, दूध, भाज्या, ब्लँकेट, कपडे, गॅससह अन्य आवश्यक वस्तु आहेत. जर आंदोलन बराच काळ सुरू राहिले तर मात्र याचा वापर करण्याचा त्यांना मनोदय आहे. या आंदोलनात जवळपास ३० पेक्षा अधिक संघटनांचा सहभाग असून ते शेतकरी कायद्यांना विरोध करीत आहेत.

नदीत फेकले बॅरिकेट्स

पंजाबमधून हजारो ट्रॅक्टरमधून रेशन, पाणी, डिझेल तसेच औषध अशा सगळ्या लवाजम्यासह हे शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास तयार आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अंबाला-कुरुक्षेत्र या नॅशनल हायवेवर अडविले असता चिडलेल्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स उचलून थेट फ्लायओव्हरवरुन खाली फेकून दिले.कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अडवण्यात येत असल्याने त्यातील काहींनी दगडफेकही केल्याचीही घटना घडली. पंजाब आणि हरियाणाच्या दरम्यान येणाऱ्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिस सातत्याने अश्रुधूराचा वापर केला.

हरयाणा- पंजाब सीमा सील

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरयाणा – पंजाब सीमा सील करण्यात आली असून एंट्री पॉइंट्सवर जवान तैनात केले गेले आहेत. हजारो पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. सात जागांवर नाकाबंदीक करुन अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दोन्ही राज्यांच्या सीमा काटेरी कुंपण आणि मोठमोठ्या दगडांनी ब्लॉक केले आहेत.कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना हरयाणामध्ये येऊन वातावरण खराब करू दिले जाणार नाही. यासाठी दिल्ली-चंडीगड हायवे ब्लॉक करण्यात आला असून, जागोजागी पोलिसांचा मोठा फोज फाटा तैनात करण्यात आला आहे अशी माहिती हरयाणा सरकारने दिली.

एक लाख शेतकरी येण्याचा दावा

कृषी कायद्याविरोधात पंजाबचे हजारे शेतकऱ्यांनी हरियाणा सीमेत प्रवेश केला. यानंतर, हरियाणा सरकारने पंजाब बॉर्डर सील केली आहे. शेतकरी संघटनांनी सीमेवर एक लाख शेतकरी येतील, असा दावा केला आहे. बुधवारी चंडीगड-दिल्ली हायवेवर १५ किलोमीटर लांब चक्काजाम झाला. अंबाला हायवेवर एकत्र आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला त्यांच्यावर वॉटरगनचा वापर करावा लागला. यानंतर कलम १४४ लागून करुन जवळपास १०० शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. यादरम्यान, शेतकरी म्हणाले की, आम्हाला थांबवल्यास दिल्ली हायवे बंद करू.