जगाच्या पोशिंद्याचा करारीबाणा…..  चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीनी  सरकारचे  जेवण नाकारले

आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने यावेळीही आपले स्वतःचे जेवणबरोबर आणले होते. बैठक सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या प्रतीनिधी मंडळासाठी जेवण घेऊन कार सेवा वाहन विज्ञान भवनात दाखल झाले.

नवी दिल्ली : कृषी कायद्याबाबत(farmer low) चर्चेसाठी विज्ञान भवनात आलेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने यावेळीही आपले स्वतःचे जेवणबरोबर आणले होते. बैठक सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या प्रतीनिधी मंडळासाठी जेवण घेऊन कार सेवा वाहन विज्ञान भवनात दाखल झाले. यापूर्वीही ३ डिसेंबर रोजी झालेल्या चौथ्या बैठकी दरम्यानही त्यांनी स्वतःचे जेवण बरोबर आणले होते. कृषी विषयक कायद्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांसोबत बोलवण्यात सरकारची ही पाचवी बैठक आहे.

शेतकऱ्यांची प्रतिनिधी मंडळाच्या या कृतीची सोशल मीडियावर चर्चा आहे .